Dr. Pramod Sawant : आयुष महाविद्यालय लवकरच होणार सुरू

600 विद्यार्थ्यांचे असणार कँपस
Dr. Pramod Sawant
Dr. Pramod SawantDainik Gomantak

सासष्टी : पेडणे येथील आयुष इस्पितळ, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे महाविद्यालय पुढील वर्षी सुरू होईल. येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आयुर्वेदिक शिक्षण संस्थांचे उद्‍घाटन तेथे केले जाईल. तेथे 600 विद्यार्थ्यांचा कॅम्पस असेल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

वैद्य नानल रिसर्च फाउडेशनतर्फे आयोजित आयुर्वेदावरील दोन दिवसीय परिषदेच्या समारोह सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आयुर्वेद वैद्यकीय क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या डॉक्टर व इतरांचा सत्कार करण्यात आला.

Dr. Pramod Sawant
Panchayat Election : पंचायतींमध्ये अवतरणार महिलाराज

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग व आयुर्वेद संपूर्ण जगात पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पंचायतींना जेवढा अधिकार आहे, तेवढा इतर कोणत्याही सरकारी किंवा निम सरकारी संस्थांना नाही. कोणाचीही अडवणूक करण्याची असेल तर ते काम सर्वप्रथम पंचायतीतूनच केले जाते. किनारी भागातील पंचायती लोकांना आपला व्यवसायही व्यवस्थित करू देत नाहीत अशा अनेक तक्रारी आपल्याकडे गत तीन वर्षांत आल्या असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी रणजीत पुराणीक, आशुतोष नानल यांचीही भाषणे झाली.

‘पंचायतींवरही भाजपचेच वर्चस्व’

गोव्यात 187 पैकी 150 पंचायतींवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहीले असे आपण जरी विधान केले असले, तरी सासष्टीतही बहुतेक पंचायतींमध्येही भाजपनेच बाजी मारल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

22 ऑगस्ट रोजी सरपंच व उपसरपंचांची निवड होणार आहे, तेव्हा सासष्टीत किती पंचायती भाजपकडे आहेत हे स्पष्ट होईल. पंचायत क्षेत्राच्या विकासास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com