Goa: Gopalrao Mayekar Condolence Meeting.
Goa: Gopalrao Mayekar Condolence Meeting.Dainik Gomantak

Goa: मराठीला राजभाषा करणे हीच मयेकरांना श्रद्धांजली!

फोंड्यात (Ponda, Goa) प्रा. गोपाळराव मयेकर (Gopalrao Mayekar) यांच्या स्मृतींना उजाळा
Published on

फोंडा : गोव्यात (Goa) मराठीला (Marathi State Language) राजभाषा करणे हीच प्रा. गोपाळराव मयेकर यांना खरी आदरांजली ठरेल, असे उद्गार शनिवारी फोंड्यात दिवंगत प्रा. गोपाळराव मयेकर यांच्या निधनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत सर्वच वक्त्यांनी काढले. फोंड्यातील विश्‍व हिंदू परिषद सभागृहात आयोजित या श्रद्धांजली सभेत प्रा. गोपाळराव मयेकर यांची जाज्वल्य मराठीप्रेमीबरोबरच एक सच्चा आणि तत्त्‍वनिष्ठ राजकारणी अशी ओळख वक्त्यांनी करून दिली.

मराठी राजभाषा समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांच्या समन्वयाखाली ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. फोंडा तालुक्यातील मराठीसाठी तसेच कला व संस्कृतीसाठी वावरणाऱ्या अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहून आदरांजली वाहिली. गो. रा. ढवळीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना गोपाळराव मयेकर यांच्याबद्दल सविस्तर माहिती दिली. आजच्या राजकारणात जी बजबजपुरी माजली आहे आणि केवळ स्वार्थी राजकारण सुरू आहे, अशावेळेला अगदी विरुद्ध असे गोपाळराव मयेकर यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांचा आदर्श आजच्या राजकारण्यांनी घ्यायला हवा, असे सांगत गो. रा. ढवळीकर यांनी त्यांच्या अनेक स्मृतींना उजाळा दिला.

Goa: Gopalrao Mayekar Condolence Meeting.
Goa: सरकारी पैशांचा वापर लोकांच्या खाजगी फायद्यासाठी

विविध संस्थांच्या प्रतिनिधींसह इतर वक्त्यांनीही विचार मांडले. सामाजिक चळवळीतून समाज प्रबोधन करण्याबरोबरच शिक्षणाचे क्षेत्र विस्तारण्यासाठी मयेकर यांनी केलेले कार्य, दिल्लीतील संसद भवनात गोपाळराव मयेकर यांनी घुमवलेला ज्ञानेश्‍वरीचा गजर आणि मराठीसाठी त्यांचे गोव्यात चाललेले प्रयत्न यासंबंधी विचार मांडण्यात आले. मराठी अकादमी आणि मराठी राजभाषा होण्यासाठी त्यांनी केलेले महत्त्वाचे कार्य, तरीही मराठीला राजभाषेचे स्थान देण्यासाठी सरकारकडून चाललेली चालढकल यासंबंधीही यावेळी विवेचन करण्यात आले. मराठीसाठी मयेकर यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन सरकारने मराठी राजभाषा करावी, असा एकमुखी घोष यावेळी करण्यात आला. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे वक्ते म्हणाले.

या कार्यक्रमात प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, डॉ. नूतन देव, माजी आमदार मोहन आमशेकर, जयवंत आडपईकर, कालिदास मराठे, राजाराम पाटील, के. डी. मनवाडकर, दिवाकर शिंक्रे, सुनीती मराठे, अविनाश रामनाथकर, विनोद पोकळे, सुभाष बाबया नाईक, राजाराम जोग, विजय पत्की, सुनंदा आमशेकर तसेच विनोद नाईक व इतरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Goa: Gopalrao Mayekar Condolence Meeting.
Goa: कॉंग्रेस अध्यक्षांची पर्तगाळ मठाला भेट व स्वामीजींचे दर्शन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com