Laser Run City Tour Competition: बाबू, शिवनाथ, युग भारतीय संघात

Laser Run City Tour Competition नेपाळमधील मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील गोव्याचे पदकविजेते खेळाडू
Laser Run City Tour Competition
Laser Run City Tour CompetitionDainik Gomantak
Published on
Updated on

Laser Run City Tour Competition नेपाळमध्ये होणाऱ्या मॉडर्न पेंटॅथलॉनमधील ग्लोबल लेझर रन सिटी टूर स्पर्धेसाठी भारतीय मॉडर्न पेंटॅथलॉन महासंघाने गोव्याच्या बाबू गावकर, शिवनाथ माजीक व युग दळवी यांची निवड केली आहे. स्पर्धा 25 व 26 नोव्हेंबरला होईल.

Laser Run City Tour Competition
Goan Films In IFFI 2023: 54व्या इफ्फीमध्ये शुक्रवारपासून गोवन चित्रपटांचे प्रदर्शन, पाहा संपूर्ण वेळापत्रक

गोव्यात झालेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमानांनी मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये यशस्वी कामगिरी बजावताना 1 सुवर्ण, 1 रौप्य व 6 ब्राँझ अशी एकूण 8 पदके जिंकली होती. स्पर्धेत गोव्याचे पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा मान बाबू गावकर याने मिळविला होता.

त्याने पुरुषांच्या लेझर रनमध्ये अव्वल कामगिरी नोंदविली. शिवाय त्याने मिश्र लेझर रनमध्ये रौप्यपदकही पटकावले होते. युग दळवी याने दोन ब्राँझपदकांची, तर शिवनाथ माजीक याने एका ब्राँझपदकाची कमाई केली होती.

Laser Run City Tour Competition
Electrical Accident: लाईन दुरुस्ती करत असताना शॉक लागून मोरजीतील वीज कामगाराचा मृत्यू

गोवा मॉडर्न पेंटॅथलॉन संघटनेचे अध्यक्ष संजीव गडकर, भारतीय मॉडर्न पेंटॅथलॉन महासंघाच्या अध्यक्ष संध्या पालयेकर, प्रशिक्षक कीर्तन वैझ, सावियो लैताव, वीरेंद्र माजीक यांनी बाबू, शिवनाथ व युग यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com