Goa KTC: पेडणे कदंबा वाहतूक कर्मचारी संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांचा सत्कार

स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून दीर्घकालीन सेवेबद्दल सत्कार (Goa KTC)
KTC Employees felicitated at Pernem - Goa. (Goa KTC)
KTC Employees felicitated at Pernem - Goa. (Goa KTC) Dainik Gomantak

पेडणे कदंबा वाहतूक संघटनेतर्फे (Pernem Kadamba Transport Association) स्वतंत्र दिनाचे (Independence Day) औचित्य साधून विलास आजगावकर, रामचंद्र परब, रामकृष्ण परब, गुरुनाथ खडपे, नारायण तांडेल, व जयंत साळगावकर या कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळीन सेवा दिल्याबद्दल त्याचा सत्कार पेडणे कदंबा बस स्थानक येथे आयोजित केला होता. या सत्कार समारंभाला अधिकारी विष्णू शेटगावकर, किशोर शिरोडकर, परशुराम खर्बे, संघटनेचे अध्यक्ष अभय परब आदी उपस्थित होते. (Goa KTC)

KTC Employees felicitated at Pernem - Goa. (Goa KTC)
Goa: सत्तरी गोमंतक मराठा समाजातर्फे निराधार महिलेला आर्थिक मदत

यावेळी संस्थेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. विष्णू परब, आबा राणे, किशोर मांद्रेकर, दयानंद नाईक, सज्जन पाडलोस्कर, भालचंद्र भगत, प्रेमानंद न्हान्जी, जयराम नाईक, दत्ताराम मोटे आदींनी पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. कदंबा महामंडळासाठी जेष्ठ कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक सेवा केली. त्यांची प्रेरणा घेवून इतरांनी महामंडळाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहावे असे आवाहन विष्णू शेटगावकर यांनी केले. या प्रसंगी परशुराम खर्बे, किशोर शिरोडकर आदींनी मनोगत व्यक्त केले . सत्कार मूर्तीना शाल श्री फळ आणि मानपत्र देवून गौरवण्यात आले. श्री. शेटगावकर, रवी नाईक, महेश ठाकूर, गजानन ताम्बोस्कर, आदींनी मानपत्राचे वाचन केले. बाळा केरकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com