Goa Kokani Academy : कोकणीत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी' या विषयावरील संवाद; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्‍घाटन

डिचोली कोकणी सेवा केंद्राच्या सहकार्याने गोवा कोकणी अकादमीतर्फे येथील हिराबाई झांट्ये स्मृती सभागृहात या उत्सवाचे आयोजन
Goa Kokani Academy
Goa Kokani AcademyDainik Gomantak

शणेै गोंयबाब यांच्या 146 व्या जयंतीनिमित्त येत्या शुक्रवारी (ता.२३) 'जयंती उत्सव''साजरा करण्यात येणार आहे. डिचोली कोकणी सेवा केंद्राच्या सहकार्याने गोवा कोकणी अकादमीतर्फे येथील हिराबाई झांट्ये स्मृती सभागृहात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

'कोकणीत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी' या विषयावरील संवाद हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. डिचोली लायन्स क्लबचा या उत्सवात सहभाग असणार आहे. अशी माहिती गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अरुण साखरदांडे आणि डिचोली कोकणी सेवा केंद्राचे अध्यक्ष रुपेश ठाणेकर यांनी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेवेळी उपाध्यक्ष विनायक गोवेकर, सचिव प्रा. प्रवीण सावंत, खजिनदार वनश्री चोडणकर आणि सहसचिव श्याम फातर्पेकर उपस्थित होते.

Goa Kokani Academy
Bageshwar Dham: बागेश्वर धामला भक्तांनी जायचे की नाही? सातत्याने सापडत आहेत भक्तांचे मृतदेह, यापूर्वी 21 जण बेपत्ता

उद्‍घाटन सोहळ्यानंतर कोकणी भाषा मंडळाची अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ यांच्या अध्यक्षतेखाली ''कोकणीत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी'' या विषयावरील संवाद होणार आहे. डॉ. भूषण भावे सादरीकरण करणार आहेत. तर टीजेएसबी बँकेचे व्यवस्थापक अरुण भट संवादात सहभाग घेणार आहेत. 'गोवा समजून घेताना' या विषयावर प्रश्नमंजुषा तसेच प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धाही घेण्यात येणार आहे.

Goa Kokani Academy
Karmal Ghat: करमल घाटात दुरूस्तीकाम; धोकादायक वळणावर कठडा बांधणार

शुक्रवारी उत्सवाचे उद््घाटन

२३ रोजी सकाळी १० वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या उत्सवाचे उद्‍घाटन होणार आहे. प्रा. साखरदांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उद्‍घाटन सोहळ्यास ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो प्रमुख वक्ते या नात्याने तर सन्माननीय अतिथी म्हणून डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट,

नगराध्यक्ष कुंदन फळारी, खास आमंत्रित म्हणून साखळी कोकणी सेवा केंद्राचे अध्यक्ष राजन शेट्ये आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष आझाद कडकडे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी वसंत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारोप सोहळ्यास गोवा माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये उपस्थित राहणार आहेत.

Goa Kokani Academy
Goa Assembly Speaker - विरोधीपक्षाने आपला वेळ मुद्दे मांडण्यासाठी वापरावा | Gomantak TV

विद्यार्थ्यांचा गौरव

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कोकणी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच कोकणीसाठी योगदान दिलेल्या महेश कडकडे (डिचोली) आणि प्रा. रघुदास तारी यांचा या उत्सवात सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com