Konkan Fruit Festival: उन्हाळी मेवा, मध आणि रोपे! कोकण फळ महोत्सव दणक्यात साजरा

Konkan Fruit Festival Goa: उत्कृष्ट फळांच्या स्पर्धेबरोबरच या महोत्सवात 'सर्वोत्कृष्ट मध' ही स्पर्धा देखील आयोजित झाली. गोव्यातील अनेक मधुमक्षिका पालकांनी मधमाशी पालनाचा छंद फार गंभीरतेने घेतला आहे
Konkan Fruit Festival Goa
Konkan Fruit Festival GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा आणि कोकणातील फळांचा महोत्सव २ ते 4 मे असे तीन दिवस नावेली येथील रोझरी हायस्कूलच्या पटांगणावर पारा पडला. बोटॅनिकल सोसायटी ऑफ गोवाने ही महोत्सवाची १९वी आवृत्ती अवर लेडी ऑफ रोझरी चर्च, नावेली यांच्या सहकार्याने घडवून आणली होती.

एप्रिल-मे महिन्यात गोवा-कोकणात पिकणाऱ्या रसरशीत फळांबरोबरच प्रक्रिया केलेली फळ उत्पादने, रोपवाटिकेतील रोपे, खते तसेच इतर कृषी संबंधित वस्तू देखील या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध होती. 

गेली अनेक वर्षे हा कोकण फळ महोत्सव राज्यातील फल उत्पादकांना प्रेरणा देण्याचे, निरनिराळ्या फळांच्या प्रजातींची माहिती लोकांना करून देण्याचे, विविध वनस्पतींचे जतन आणि काळजी घेण्याचे, फळांसंबंधीत निरनिराळ्या (जॅम, स्क्वेश आदी) उत्पादनांच्या निर्मितीचे शिक्षण देण्याचे केंद्र बनत चालला आहे.

Goa Mango Rate
Goa Mango Market PricesDainik Gomantak

उत्कृष्ट फळांच्या स्पर्धेबरोबरच या महोत्सवात 'सर्वोत्कृष्ट मध' ही स्पर्धा देखील आयोजित झाली. गोव्यातील अनेक मधुमक्षिका पालकांनी मधमाशी पालनाचा छंद फार गंभीरतेने घेतला आहे. मानवी अस्तित्व राखण्यासाठी मधमाशांचे अस्तित्व किती महत्त्वाचे आहे हे आपल्यापैकी अनेकांना आज उमजून आले आहे.

परागीकरणात मधमाशांचा असलेल्या सहभागाचे महत्व जाणण्याबरोबरच वनस्पतींच्या स्थानिक प्रजातींचे महत्त्वदेखील आज कोकण फळ महोत्सवासारख्या उपक्रमातून लोकांना कळत आहे. 

Konkan Fruit Festival Goa
Summer Fruits: चढ्या दराने 'चुरने' बाजारात दाखल! करवंदे, जांभळं गैरहजर; ग्राहक प्रतिक्षेत

या महोत्सवाच्या तीन दिवसात आंबे, फणस, चिकू, काजू, अननस, जांब या फळांच्या वेगवेगळ्या उत्कृष्ट जातींचे दर्शन लोकांना घडले. या सर्व फळांचे वेगवेगळे प्रकार गोव्यात आहेत मात्र आपल्यापैकी अनेक जणांना त्यांची ओळख नाही. या महोत्सवात तज्ज्ञांमार्फत अशा फळांची ओळख करून घेता आली. या महोत्सवाच्या आयोजनात ‘बोटॅनिकल सोसायटी ऑफ गोवा’च्या एस्थेला पिरीस आणि लिझा पिन्हेरो यांच्याबरोबर डॅनियल डिसोजा,  आवर लेडी ऑफ रोझरी चर्चचे फादर गॅब्रियल कुतिन्हो, कृषी संचालनालय गोवा कृषी महाविद्यालय, वन विभाग आणि इतर सरकारी संस्थांचा सहभाग होता.

Konkan Fruit Festival Goa
Goa Mango Price: आंब्यांची आवक वाढली, दर मात्र चढेच; सामान्य ग्राहकांच्या खिशाला अजूनही चाट

४ मे पर्यंत चाललेल्या या तीन दिवसांच्या  महोत्सवामध्ये प्रक्रिया केलेल्या फळ उत्पादनांची स्पर्धा, मध स्पर्धा तसेच मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, फळांचे वजन ओळखण्याची स्पर्धा, फळे खाण्याची स्पर्धा आदी मजेदार उपक्रम होते ज्यांचा आनंद उपस्थितांनी घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com