Goa News: राज्यात बिनदर्जाच्या काजू जप्तीचा तमाशा!

Goa News: गोव्यात विकल्या जाणाऱ्या कमी दर्जाच्या काजू विक्रेत्यांविरोधात वजन आणि माप खात्याने कारवाईचा बडगा उचलला आहे.
Goa News | Cashew
Goa News | CashewDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: गोव्यात विकल्या जाणाऱ्या कमी दर्जाच्या काजू विक्रेत्यांविरोधात वजन व माप खात्याने कारवाईचा बडगा उचलला आहे. मात्र, सध्या त्याबाबत कठोर कारवाई करण्यात त्यांना अपयश आले आहे. दुसऱ्या बाजूला अन्न व औषध प्रशासनाने (एफडीआय) या दर्जाहिन मालाविरोधातील तक्रारीसंदर्भात जी तातडीने कारवाई करायला हवी होती, ती होत नसल्याने राज्यातील नामांकित उत्पादक मात्र निराश झाले आहेत. (Goa News)

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर 14 ऑक्टोबरला वजन व माप खात्याने उत्तर व दक्षिण गोव्यातील काही अस्थापनांवर धाडी टाकल्या होत्या. ही मोहीम पर्यटक व स्थानिकांकडून आलेल्या तक्रारीवर आधारीत होती. समाजमाध्यमांवर मोठा गहजब झाला व राज्यातील काजू विक्रेत्या महासंघाने तशी रितसर तक्रार एफडीआयकडे नोंदविली होती.

Goa News | Cashew
Goa CM Watches Solar Eclipse: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद

दुर्दैवाने एफडीआयने त्याबाबत कारवाईची कोणतीही पावले उचलली नाहीत. उलट वजन व माप खात्याने मात्र कळंगुट तसेच मडगाव, वार्का, कोलवा, बाणावली, चिंचोणे येथे असलेल्या दुकानांसह पॅकेजिंग चालू असलेल्या ठिकाणी धाडी टाकून माल जप्त केला होता. या खात्याने अजून त्याबाबत कठोर कारवाई केलेली नाही. उलट हा माल परत देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशा तक्रारी येऊ लागल्या आहेत.

‘आम्ही मालाचा दर्जा तपासू शकत नाही. हे काम अन्न व औषध प्रशासनाचे आहे. आम्ही मालाचे वजन तेवढे मापून विक्रेत्याला योग्य पॅकेजिंगमध्ये ते आम्हाला पुन्हा सादर करायला भाग पाडतो. ही मोहीम चालूच ठेवली असली तरी दरम्यानच्या काळात स्वयंपाकाच्या गॅस संदर्भात वाढत्या तक्रारी आल्यामुळे आम्हाला तेथे धाव घ्यावी लागली.

गोव्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये प्रत्येकी दोन किलो गॅस काढला जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत व त्यामध्ये आम्हाला तथ्य आढळले आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दैनिक ‘गोमन्तक’ला दिली.

Goa News | Cashew
Wagro Konkani Film : गोव्याच्या 'वाग्रो'चा गौरवास्पद प्रवास

राज्यातील अधिकृत काजू विक्रेत्यांनी राज्यात फोफावलेल्या कमी दर्जाच्या काजू विक्रेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. राज्याबाहेरच्या बऱ्याच काजू विक्रेत्यांच्या दुकानांचे सध्या गोव्यात पेव फुटले आहे व ते देशाबाहेरून विशेषतः आफ्रिकेहून कमी दर्जाचा माल आणून तो गोव्याचाच असल्याचे दाखवितात. हा माल कमी दर्जाचा असतो, तो गोव्यात प्रक्रिया करून वेगवेगळ्या रंगात आणि मसाल्यात मिसळतात.

दुर्दैवाने थोडी कमी किंमत असल्याने पर्यटकही त्याला फसतात. परंतु त्यामुळे गोव्याचे नाव बदनाम होते, अशी माहिती काजू विक्रेत्या संघाच्या एक प्रतिनिधीने ‘गोमन्तक’ला दिली. त्यांनी या संदर्भात यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या संचालकांकडे रितसर तक्रार नोंदविली आहे.

भेसळयुक्त माल

  • वाढत्या पर्यटनाची गरज ओळखून भेसळयुक्त पद्धतीने कमी किंमतीला विकण्याचे कसब परराज्यातील विक्रेत्यांनी साध्य केले आहे. हा काजू गुजरातमधील बरेचसे विक्रेते प्रक्रिया करून विकत असून, त्यांनी पणजीत मोठ्या प्रमाणावर व्यवसाय थाटला आहे.

Goa News | Cashew
Silent Zone Or Commercial Zone: मोरजी, मांद्रे सायलेंट झोन किनारा कमर्शियल झोन जाहीर
  • गोवा व कोकणातील काजूगर विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करणारे अंदाजे 40 आस्थापने 2005 मध्ये गोव्यात होती. त्यातील अनेक आस्थापने सध्या बंद आहेत. दुर्दैवाने यात नीतिमत्ता नसलेले विक्रेते कमी दर्जाचा काजू पैदास करून विकतात.

  • बारा वर्षांपूर्वी 80 टक्के काजू स्थानिक पातळीवरच तयार होऊन येथे विकला जात असे. परंतु सध्या सुमारे 50 टक्के काजू आयव्हरी कोस्ट, इंडोनेशिया व आफ्रिकेतून राज्यात येतो. इतर राज्यात त्यावर प्रक्रिया होऊन येथे तो वेगवेगळी लेबले लावून विकला जातो.

वजन व माप खात्याच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अजून अंतिम कारवाईचा अहवाल आम्ही सादर केलेला नाही. परंतु कमी वजनाचा माल विकणाऱ्या विक्रेत्यांना आम्ही 10 ते 25 हजार रकमेचे दंड ठोठावले आहेत. हा माल कमी वजनाचा होता व बराचसा दर्जाहिन होता, हे या अधिकाऱ्याने मान्य केले.

Goa News | Cashew
Dangerous Roads in Goa: वीज वाहिन्यांसाठी खोदकाम; मांद्रेत रस्ते बनले धोकादायक

प्रवीण झांट्ये, झांट्ये आस्थापनाचे प्रमुख-

दर्जाहीन काजू राज्याबाहेरून येथे आणून कमी किमतीत विकण्याचा जो प्रकार चालू आहे, तो खात्रीने आक्षेपार्ह आहे. शिवाय गोव्याच्याही प्रतिमेला तो काळीमा लावतो.

प्रसाद शिरोडकर, नियंत्रक, वजन व माप खाते-

दर्जहिन काजू विक्रेत्यांवरील आमची मोहीम चालूच आहे आणि अद्याप अंतिम कारवाई केलेली नाही. जप्त केलेला माल अजूनही आमच्याच देखरेखेखाली ठेवला आहे.

ज्योती सरदेसाई, संचालक, एफडीए-

वजन व मापे खात्याला मालाच्या दर्जाविषयी कारवाईचे अधिकार नाही. परंतु आम्ही त्याबाबत तक्रारींची योग्य ती दखल घेऊन कारवाई सुरू करणार आहोत. राज्यातील वाढत्या तक्रारींची आम्हाला जाणीव आहेच.

Goa News | Cashew
Goa Crime: उपअधीक्षक सागर एकोस्कर विरोधातील दोन तक्रारीवर 10 रोजी एसपीसीए समोर सुनावणी

अधिकृत काजू विक्रेते-

वजन व मापे खात्याची कारवाई तमाशाच वाटतो. दोषींवर वास्तवपूर्ण कारवाईचा अधिकार एफडीएला असताना, ते मात्र निष्क्रियतेने बसलेले आहेत. ते कोणाच्या दबावाखाली कारवाई करत नाहीत, याची चौकशी झाली पाहिजे.

गोव्याची प्रतिमा मलीन: गोव्यात तयार होणाऱ्या दर्जेदार काजू पॅकेटची किंमत 200 ते 250 रुपये असता बाहेरून येणाऱ्या कमी दर्जाच्या काजूची किंमत 150 रुपये असल्याने स्थानिकांना या स्पर्धेला तोंड द्यावे लागते आहे. शिवाय हा काजूही वाईट असल्याने गोव्याची प्रतिमा त्यामुळे काळवंडू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com