Kidnapping: आके येथे मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न!

गावात भीतीचे वातावरण; 50% प्रकरणांची पोलिसात तक्रारच होत नसल्याची माहिती
Kidnapping
KidnappingDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: आके- मडगाव (Margao area) या भागात भरदिवसा एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा (Kidnapping) प्रयत्न करण्यात आल्याची माहिती असून ही घटना होऊन 24 तास उलटून गेले, तरी भीतीच्या छायेखाली असलेल्या त्या मुलीच्या पालकांनी अजून पोलीस (Goa Police) तक्रार न केल्याने या प्रकरणाचा सुगावा लागू शकलेला नाही. यामुळे या भागात इतर पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. या परिसरात राहणारी एक 13 वर्षीय मुलगी घराच्या जवळच असलेल्या एका दुकानात चिप्स घ्यायला आली असता हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. ती मुलगी राहत असलेली इमारत आणि ते दुकान यांच्यामध्ये एक निर्जन अशी जागा असून तिथे एका गाडीतून आलेल्या दोघा किशोरवयीन मुला- मुलीने तिच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.

Kidnapping
Goa Murder Case: तपास यंत्रणेचा पोलीस महासंचालकांनी घेतला समाचार

हाताचा चावा घेऊन केली सुटका

या भागात आपला चित्रकलेचा स्टुडिओ चालविणाऱ्या इंदिरा पै आंगले यांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ही घटना घडल्यानंतर बराच वेळ मुलगी घरी न आल्याने तिची आई चौकशीसाठी त्या दुकानावर आली असता ती मुलगी परत घरी गेल्याचे तिला सांगण्यात आले. त्यांनतर शोधाशोध सुरू झाली. काही वेळाने ती मुलगी स्वतःच तिथे आली, पण ती अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. त्या दोघांच्या हाताचा चावा घेऊन आपण आपली सुटका केल्याचे तिने सांगितले. मात्र, एवढा गंभीर प्रकार होऊनही यासंबंधी मंगळवारी रात्रीपर्यंत कुठलीही तक्रार करण्यात आली नव्हती.

तरीही आम्ही चौकशी करू

यासंबंधी मडगावचे पोलिस उपअधीक्षक हरीश मडकईकर यांच्याशी संपर्क साधला असता अजूनही याबाबत कुणी तक्रार केलेली नाही. तरीही आम्ही या प्रकरणात चौकशी करू असे त्यांनी सांगितले. या मुलीला भीतीने ताप आल्याने ती काहीही सांगण्याच्या अवस्थेत नसल्याचे त्या भागातील लोकांनी सांगितले.

आणखी एका मुलीचे अपहरण

दरम्यान, मडगावातच काल आणखी एका मुलीच्या अपहरणाचे प्रकरण उघडकीस आले असून या अल्पवयीन मुलीला तिच्या कथित प्रियकराने घरातून नेले होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, या प्रकरणी मडगाव पोलिसात तक्रार नोंद झाली आहे. आवडा व्हिएगस यांनी मागच्या काही काळात अशी अपहरणाची प्रकरणे वाढली असून दुर्दैवाने किमान 50 टक्के प्रकरणात पालक पोलिस तक्रार करण्यास पुढेच येत नसल्याचे सांगितले. पोक्सो कायद्याप्रमाणे अशा गुन्ह्यांची माहिती कुणालाच लपविता येत नाही. मुद्दामहून कुणी माहिती लपविली, तर माहिती लपविणाऱ्यावर कारवाई होऊ शकते. त्याला पालकही अपवाद असू शकत नाहीत.

Kidnapping
Goa Crime: तो गोव्यात कामासाठी आला अन्‌...

तो मुलगा रेल्वे स्थानकावर सापडला

कवळे-फोंडा येथील एक 14 वर्षीय मुलगा घरातून गायब झाला होता. त्याला शेवटचे मडगाव बसस्थानकावर पाहिल्याची एक पोस्ट समाजमाध्यमातून व्हायरल झाली. हा मुलगा नंतर मडगाव रेल्वे स्थानकावर सापडला, अशी माहिती पोलिसांनी दिली. वडील रागावल्यामुळे तो घर सोडून आला होता.

जर भरदिवसा असे अपहरणाचे प्रकार घडू लागले, तर तो अत्यंत गंभीर प्रकार आहे. पोलिसांनी अशा गोष्टीकडे तिऱ्हायितासारखे न पाहता गंभीरपणे अशी प्रकरणे हाताळून पालकांना दिलासा देण्याची गरज आहे. अशी प्रकारणे अधिक संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज आहे

- इंदिरा पै आंगले, मडगाव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com