Agriculture: केरी पंचक्रोशीतील शेतकरी संकटात; शेती-बागायातीत गव्यांचा हैदोस

Agriculture: सततच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरीवर्ग कमालीचा त्रस्त बनलाय.
Agriculture
AgricultureDainik Gomantak
Published on
Updated on

In agriculture and horticulture, herds of wild animals are invading and destroying cultivated trees: केरी पंचक्रोशीतील वन्यप्राण्यांचा त्रास गेली कित्येक वर्षे स्थानिक सहन करत असून सध्या या परिसरातील शेतकरी-बागायतदारांना गव्या रेड्यांनी त्रास द्यायला सुरुवात केलीय.

केरी पंचक्रोशीतील बागायतदारांच्या शेतीत - बागायती गवा रेड्यांचा कळप घुसून लागवड केलेल्या झाडांची, शेतीची नासधूस करत आहे. सततच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरीवर्ग कमालीचा त्रस्त बनलाय.

गवारेड्यांचा वावर हा लोकवस्ती पर्यंत सुरू असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.

बुधवारी सकाळी गादो वाडा-केरी येथे फिरणाऱ्या 8 ते 10 गवारेड्यांच्या कळपाने बागायतीसह -शेतीला लक्ष बनवले आहे.

नवीन लागवड केलेल्या सुपारी, नारळाच्या झाडांची नासधूस केली असून शेतकऱ्यांची मेहनत वाया गेलीय.

Agriculture
Sattari News : सत्तरीत बागायतदारांचे खेत्यांकडून नुकसान : डॉ. दिव्या राणे

अधिवेशन काळात पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी वन्य प्राणांमुळे होणाऱ्या नुकसानी प्रश्नासंबंधी विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित केला होता.

त्या म्हणाल्या होत्या, 'लाल तोंडाची माकडे ज्यांना खेती म्‍हणतात त्यांनी शेतकरी, बागायतदारांना जीवन नकोसे करून टाकले आहे.

सौरकुंपण घालून, आवाज करणाऱ्या उपकरणांचा वापर करून त्यांचा बंदोबस्त केला जाऊ शकतो. याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.

आवाज करणारी उपकरणे काहींनी घेतली; पण ती चालत नाहीत, त्यातून आवाजच येत नाही. नारळ पक्व होण्याआधीच पाडले जात असल्याने नारळाची टंचाई निर्माण होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com