काणकोण पालिका
काणकोण पालिका Dainik Gomantak

Goa:नोकरीत कायम करा अन्यथा निवडणुकावर बहिष्कार टाकू

शेवटचा उपाय म्हणून मागणी मान्य न झाल्यास आगामी सर्व निवडणूकावर बहिष्कार (Boycott)टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असा या निवेदनात कामगारांनी(Workers) सांगितले.
Published on

काणकोण: नोकरीत कायम करा अन्यथा आगामी निवडणुकावर(election) कुटुंबियासहीत बहिष्कार (Boycott)टाकण्याचा काणकोण पालिकेच्या (Kankon Palika)कंत्राटी व रोजंदारी कामगारांनी एका निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. या कामगारांना कायम न करता पालिका नवीन कायम स्वरूपी जागांवर नव्या उमेदवार नेमण्याची तयारी करत आहे त्याला कामगारांचा सक्त विरोध असल्याचे या कामगारांनी सांगितले आहे. सुमारेपन्नास कंत्राटी व रोजंदारी (Contract and wages)कामगार पालिकेत आहेत. गेली २३ वर्षे इमाने इतबारे त्यांनी पालिकेत सेवा दिली आहे.काही कामगार कोणताच वित्तीय फायदा न मिळता निवृत्तही झाले आहेत.

पालिकेने या कामगारांवर आज पर्यत अन्याय करून शोषण केले आहे असे या कामगारांचे म्हणणे आहे.कायम स्वरूपी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती पासून कामगार वंचित आहेत.पगारवाढ नाही, वैद्यकीय, वाहतूक भत्ता नाही अशा परिस्थितीत कामगारांना काम करावे लागते आणि नवीन नोकरभरती (Recruitment)करताना या कामगारांच्या नाकावर टिच्चून नवीन उमेदवाराना नोकरीत सामावून घेण्यात येत आहेत.

काणकोण पालिका
'काणकोण पालिकेच्या प्रभागांची फेररचना होणार'

हा अन्याय आहे. त्यासाठी शेवटचा उपाय म्हणून मागणी मान्य न झाल्यास आगामी सर्व निवडणूकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असा या निवेदनात कामगारांनी सांगितले.

या निवेदनाच्या प्रति राष्ट्रपती,(President) पंतप्रधान,(PM) मुख्यमंत्री,(CM) उपसभापती,(Deputy Speaker),नगरनियोजन मंत्री,पालिका प्रशासन, निवडणूक आयोग,मुख्य निवडणूक अधिकारी,(CEO)कामगार आयुक्त गराध्यक्ष, काणकोण मामलेदार, मुख्याधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार व सबंधीत अधिकाऱ्याना पाठवून देण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com