Callosa Blossom In Goa: कणकुंबी-बेटणेत फुलली निळी-जांभळी कारवी

Karvi Strobilanthes Callosa Blossom In Goaचोर्लात पुढील वर्षी बहर : सात वर्षानंतर निसर्गाचा अनोखा आविष्कार
Strobilanthes Callosa
Strobilanthes CallosaDainik Gomantak
Published on
Updated on

संजय घुग्रेटकर

Karvi Strobilanthes Callosa Blossom In Goa: सह्याद्रीच्या पर्वत रांगात काही ठिकाणी कारवी फुलली असून जांभळी-निळी गेल्या चार दिवसांपासून दृष्टीस पडत आहे.

चोर्लाघाटाच्या वरील भागात कणकुंबी-बेटणे परिसरात मोठ्या प्रमाणात अगदीच रस्त्याच्या कडेला कारवी सात वर्षानंतर फुलली आहे. चोर्लाघाटात मात्र कारवीची हिरवी झाडे डौलाने मिरवत आहेत, कदाचित पुढील वर्षी फुलांचा बहर येण्याची शक्यता आहे.

या कारवीचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे तिचा एकत्रित बहर, सृष्टीचा एक अलौकिक रंग सोहळा असतो. सात वर्षा काहीच नसते आणि अचानक फुले येतात. जांभळ्या रंगाची टपोरी फुले लेऊन जेव्हा ही झाडे संपूर्ण बहरतात, तेव्हा डोंगर उतारांना त्या रंगाच्या छटा प्राप्त होतात.

या फुलांमधे भरपूर पराग आणि मकर मिळत असल्यामुळे मधमाश्‍या या बहराच्या वेळी कारवीच्या जाळीवरच डेरा देऊन बसतात. बेळगाव-चोर्लाघाट रस्त्यांवरील बेटणे परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात कारवी फुलली असून प्रवाशी थांबून कारवीचे दर्शन घेतात.

गुरांनाही आवडते!

कारवीच्या आश्रयाला वाढणारे अनेक कीटक जंगलातील इतर वृक्षांच्या परागीभवना/ परागीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असल्यामुळे कारवी जंगल संवर्धनास अप्रत्यक्षरीत्या का होईना; पण मोलाचा हातभार लावते. बहर ओसरला, की कारवीची बोंडे सुकू लागतात. या बोंडांवर तरळणारा चिकट तरल द्रव चाखायला गुरांना आवडते.

औषधी गुणधर्म

सह्याद्री घाटात ही वनस्पती भरपूर शिगाव, धारबांदोडा, चोर्लाघाट, कणकुंबी, बेटणे, आबोलीत मोठ्या प्रमाणात दिसून येते. खोडाची साल वेदनाहारक असून, मुरड्यावर शेकण्यास व लाळ-ग्रंथीच्या दाहयुक्त सुजेवर बाहेरून लावण्यास उपयुक्त असते.

फुलांनी जखम भरून येते. पाने जनावरांना चारतात. झाडे वरचेवर छाटून त्यानंतर आलेल्या बारीक फांद्या छप्पर व कुडाच्या भिंतीसाठी वापरतात.

कारवीची पुष्पोत्सव!

कारवीच्या उंचच उंच सरळसोट वाढणाऱ्या काड्यांचा वापर कुडाचे घर बांधण्यासाठी करतात. एवढेच काय तर कारवीच्या मुळांवर काही परजीवी वनस्पतीदेखील वाढतात.

अशा या बहुपयोगी कारवीचा दर सात -आठ वर्षांनी सह्याद्रीत फुलणारा असा हा आगळावेगळा पुष्पोत्सव मन भरून पाहाता येते. बेळगावला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी आठ दिवस हा पुष्पोत्सव पाहता येईल.

Strobilanthes Callosa
Goa Industrialization: औद्योगिकीकरणाला गती, लागू होणार नवा नियम, वेळही लागणार कमी: आलेक्स रेजिनाल्ड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com