Kala Academy Goa: आयुक्तांविरोधात लोकायुक्तांकडे देणार तक्रार- सुदीप ताम्हणकर

Kala Academy Goa: कला अकादमीच्या कामाविषयीची माहिती दिली नाही.
Goa News | Sudip Tamhankar
Goa News | Sudip TamhankarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Kala Academy Goa: कला अकादमीच्या कामाविषयी महापालिकेकडे 24 लाख 13 हजार 500 रुपयांच्या परवाना शुल्काविषयीची आरटीआय अंतर्गत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे आयुक्त आग्नेल फर्नांडिस यांना नोटीस पाठवली आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याविषयी आपण आयुक्तांविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार नोंदविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ताम्हणकर म्हणाले की, कला अकादमीचे काम सुरू झाल्यानंतर महापालिका आयुक्तांना केवळ पत्रे दिसले. त्यामुळे त्यांनी अकादमीस 2 जून 2021 रोजी काम स्थगितीची नोटीस बजावली. कारणे दाखवा नोटीस बजावून त्याविषयी 11 जूनला सुनावणी ठेवली. नोटीस मिळाल्यानंतर कला अकादमीचे सदस्य सचिव व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी सुनावणी झाल्यानंतर ‘कारणे दाखवा’ नोटीस मागे घेऊन दुसरी नोटीस बजावली.

Goa News | Sudip Tamhankar
Goa Taxi Driver: गोव्यात अशी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही; मुख्यमंत्र्यांचा टॅक्सीचालकांना इशारा

महापालिका कायद्यानुसार ही नोटीस बजावताना पुनःनिर्माण कामाविषयीचे जे शुल्क 24 लाख 13 हजार 500 आहे ते भरावे असे सूचित करण्यात आले. हे पैसे कोणी भरले, याची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे आम्ही कला अकादमी आणि कला व संस्कृती खात्याकडे आरटीआय अंतर्गत माहिती मागितली.

कला व संस्कृती खात्यास अर्ज दिला आणि 27 ऑक्टोबर 2022 रोजी कला व संस्कृती खात्याने महापालिकेस हा अर्ज पाठविला. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्याने त्यावर याविषयी काहीच माहिती उपलब्ध नसल्याचा शेरा मारून तो अर्ज पाठवून दिला.

राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, असे सांगून ताम्हणकर यांनी घटनांचे दाखले दिले. आयुष मंत्रालयाचा कार्यक्रम असताना आरोग्य मंत्र्यांनाच का बोलावले जात नाही, असा सवालही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

F N Souza Hanuman Painting
Goa Cabinet Decisions, CM Pramod Sawant
Karapur One Goa Project Protest
Supreme Court POCSO Case Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com