Goa GPSC Jobs : गोवा लोकसेवा आयोग (GPSC) मामलेदार, संयुक्त मामलेदार, दक्षता अधिकारी आणि ब्लॉक विकास अधिकारी (BDOs) साठी 24 पदे भरणार आहे. जीपीएससीने सांगितल्याप्रमाणे, मामलेदार पदासाठी इच्छुक उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी, स्थानिक महसूल कायद्यांचे ज्ञान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीचे कायदे, नियोजन आणि विकास कामे आणि कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (Goa Government Jobs)
GPSC द्वारे जाहिरात केलेल्या इतर पदांमध्ये सरकारी पॉलिटेक्निकचे प्राचार्य, उद्योग व्यापार आणि वाणिज्य संचालनालयातील नियोजन अधिकारी, कार्डियाक ऍनेस्थेसियोलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक, गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एंडोक्राइनोलॉजी आणि मेडिसिनचे व्याख्याता आणि हार्मोनियममधील सहायक प्राध्यापक यांचा समावेश आहे. (Goa GPSC Jobs)
GPSC ने सांगितल्याप्रमाणे, व्यावसायिक महाविद्यालये, आरोग्य सेवा संचालनालयातील सल्लागार आणि उच्च तांत्रिक/वैज्ञानिक पदांसाठी कोकणी भाषेचे ज्ञान असलेले योग्य उमेदवार उपलब्ध नसल्यास, इतर योग्य उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.
आयोगाच्या शिफारशीनुसार सरकार ही अट शिथिल करू शकते किंवा यात बदल करू शकते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.