ITI Admission: गोवा सरकारी आणि खासगी ITI प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर, बुधवारपासून करता येईल ऑनलाईन अर्ज

गोवा सरकारच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता संचालयनालयाच्या वतीने प्रवेशाबाबत माहिती दिली आहे.
Goa ITI Admission 2023-24
Goa ITI Admission 2023-24Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa ITI Admission 2023-24: शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी सरकारी आणि खासगी आयआयटीमध्ये प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. रिक्त जागांसाठी बुधवारपासून (दि. 23 ऑगस्ट) ऑनलाईन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.

गोवा सरकारच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता संचालयनालयाच्या वतीने प्रवेशाबाबत माहिती दिली आहे.

रिक्त जागांसाठी 23 ते 29 ऑगस्ट 2023 याकाळात अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन प्रवेश पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी पूर्वी अर्ज केले व जे गुणवत्ता यादीत आहेत पण त्यांना प्रवेश मिळाला नसेल आणि प्रवेश घेतलेले उमेदवार जे ट्रेडमध्ये बदल करू इच्छितात त्यांच्यासाठी गुणवत्ता व प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा तत्वावरती प्रवेश गुणवत्तेवर आधारित असेल.

संबधित आयटीआय व ट्रेडच्या रिक्त जागांच्या उलब्धेवर अवलंबुन असेल.

विशेष मोहीम उर्वरीत रिक्त जागा भरण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Goa Facebook Part Time Job Scam
 Goa Online Investment Fraud
Bengaluru delivery boy harassment case
Goa ITI Fee Waiver
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com