Goa
Goa Dainik Gomantak

Goa News : तर गोवा सर्वांत प्रदूषणकारी राज्य! राजेश वेरेकर

Goa News : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराचा परिणाम

Goa News :

फोंडा, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे नजीकच्या काळात गोवा देशातील सर्वांत जास्त प्रदूषित राज्य ठरण्याचा धोका असल्याचा इशारा फोंड्यातील काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर यांनी दिला आहे.

सरकारी यंत्रणेचा गलथानपणाच याला कारणीभूत ठरेल, असेही वेरेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. राज्यात अनेक ठिकाणी साचलेला कचरा गलिच्छपणा विविध रोगराईंना निमंत्रण देणारा ठरला असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील विविध आस्थापनांमध्ये एफ्लूएंट ट्रिटमेंट प्लांटस् आणि मलनिस्सारण प्रकल्पाची कार्यप्रणाली कमजोर असल्याचे उघड करणाऱ्या गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अलीकडील अभ्यास अहवालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजेश वेरेकर यांनी गोव्याला लवकरच आरोग्य आणि पर्यावरणीय संकटांचा सामना करावा लागेल, असा इशाराही दिला.

Goa
Goa Todays Update News: स्मार्ट सिटीच्या कामांचा अहवाल हायकोर्टात मांडण्यात आला

...मंडळ अपयशी!

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्यातील विविध औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पांतील प्रदूषण नियंत्रित करण्यास अपयशी ठरले आहे. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला मरगळ झटकून जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्‍यक आदेश द्यावेत, असेही राजेश वेरेकर यांनी सुचवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com