‘लॉजिस्टिक्स हब’साठी गोवा योग्य : सुरेश प्रभू

गोव्यातील शेतकऱ्यांना, फळ बागायतदारांना फायदा
suresh prabhu
suresh prabhuDainik gomantak
Published on
Updated on

गोवा हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने एक चांगले लॉजिस्टिक्स हब बनण्याची क्षमता येथे आहे, असे मत माजी केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

गोव्यात लॉजिस्टिक हब करण्याची घोषणा केल्यावर काहींनी टीका केली होती. मात्र, आता विमानतळ सुरू झाले, कार्गो हब झालेला आहे यात आणखी सुधारणा होऊ शकतात. गोव्यातील शेतकरी, बागायतदारांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या मुख्य उद्देशाने लॉजिस्टिक हबची संकल्पना मांडलेली होती, असे प्रभू यांनी स्पष्ट केले.

suresh prabhu
Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर वुद्ध महिलेच्या बॅगेत सापडल्या पिस्तुलाच्या बुलेट्स, गुन्हा दाखल

बाणावली येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या प्रभू यांनी ही माहिती दिली. केंद्रीय वाणिज्य व उद्योग ही दोन खाती हाताळताना आपण गोव्याला लॉजिस्टिक हब करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तत्काळ दिल्लीतून तीन दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक गोव्यात पाठवले गेले. त्यांच्याकडून गोव्यातील साधनसुविधांचा सारासार अभ्यास करून अहवाल देण्यात आला. आता त्या दृष्टीकोनातून काम होत आहे.

काही दिवसांपूर्वी विमानतळावर गेल्यावर विचारणा केली होती. अजूनही त्यादृष्टीने खूप काम होऊ शकते. लॉजिस्टिक हब केल्याने केवळ उद्योजकांनाच नाही, तर येथील शेतकऱ्यांना, बागायतदारांनाही मोठा फायदा होणार आहे.

suresh prabhu
karnataka Election : ग्रामीण कर्नाटकचा विकास भाजपच करू शकतो : मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोव्यात काजू, आंबा, नारळ, सुपारी, फणस अशी उत्पादने घेतली जातात. या सर्व वस्तू गोव्यातून निर्यात करता येऊ शकतात. याशिवाय गोव्यातील दूध, मासळी निर्यात करण्यासाठीही लॉजिस्टिक हबचा वापर केला जाऊ शकतो, असे ते म्हणाले.

गोव्यात राज्याबाहेरून काजू का?

गोव्यात राज्याबाहेरील काजू येत असल्यास ते राज्यात का येतात याचा विचार करावा लागेल. गोव्यात मुबलक काजू उपलब्ध होत असल्यास राज्याबाहेरून काजू आयात करण्याची वेळ येणार नाही. त्याचबरोबर इतरही कारणांचा शोध घेत राज्यातील काजूला भाव मिळण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com