मोरजी: गेले आठ महिने ठाणे गावात विज समस्या (electricity problem) आहे. अनियमित विज सेवा (Irregular electricity service) होत असल्यामुळे नागरिकात मोठी नाराजी दिसते. सध्या शालेय शिक्षण ऑनलाइन पद्धतीने असल्यामुळे विज की अत्यावश्यक झाली आहे. त्यामुळे अनियमित विज सेवेचा त्रास मुलांनासुद्धा होताना दिसतोय. विज दुरावस्थेमुळे गावातील व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसलेला दिसतो या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मिशन फॉर लोकल संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगावकर आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच हणखणे गावातील ग्रामस्थांनी पेडणे विज उप अभियंता दामोदर तारी यांच्याकडे निवेदन याचिका सादर केली.
गेल्या आठ महिन्यात हणखणे गावात (In the village of Hankhane) अनियमित विज सेवा होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो. वीज नसल्यामुळे अनेकांचे धंदे ठप्प होतात. अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून ही समस्या सोडवावी अशी विनंती मिशन फॉर लोकल संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी केले.
आदर्श गावाचा सन्मान दिलेल्या हणखणे गावात वीज समस्येवर तोडगा मात्र निघत नाही. गेले कित्येक दिवस अनियमित वीज सेवा सुरू आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात आहे आणि अशा स्थितीत वीज जाऊन येथील येथील मुलं समस्येच्या जात्या खाली भरडली जात आहेत, असे हणखणे गावातील स्थानिक गुरुदास कालेकर यांनी म्हटले. दरम्यान या सगळ्याला निव्वळ स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हेच कारणीभूत आहेत. त्यांनी जर यात लक्ष घातला असता तर ही समस्या ओढवली नसती असे मिशन फॉर लोकलचे प्रवक्ते राजू नर्से यांनी म्हटले.
येत्या काही दिवसांतच या समस्येवर तोडगा काढून नियमित वीज सेवा पुरवली जाण्याचं आश्वासन अभियंता दामोदर तारी यांनी ग्रामस्थांना दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.