डिचोली: राज्याची (Goa) आर्थिक वृद्धी आणि प्रगतीसाठी स्थानिक व्यावसायिकांनी राज्यातच गुंतवणूक करावी. असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केले आहे. साखळी शहराचा झपाट्याने विकास होत असून, विविध क्षेत्रातील व्यावसायिक या शहराकडे आकर्षित होत आहेत. ही शहराच्या आर्थिक विकासाच्यादृष्टीने चांगली गोष्ट असल्याचे मतही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.
डिचोली शहरातील यशानंतर विविध आणि उत्कृष्ट दर्जाच्या रेडिमेड कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या "फातिमा कलेक्शन" (Fatima Collection) या आस्थापनाने आता साखळी शहरात पाऊल ठेवले आहे. शनिवारी विशेष सोहळ्यात डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे उघडण्यात आलेल्या फातिमा समूहाच्या 'फातिमा लाईफस्टाईल" या आठव्या दालनाचे फीत कापून उदघाटन केले.
सभापती पाटणेकर यांनी यावेळी बोलताना फातिमा समूहाचे अभिनंदन करून, साखळी शहरात सुरु केलेल्या आस्थापनाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी साखळीचे उपनगराध्यक्ष राजेश सावळ तसेच अन्य मान्यवर उपस्थित आणि मुजावर कुटुंबिय उपस्थित होते. "फातिमा लाईफस्टाईल"चे मालक शाबाज मुजावर यांनी स्वागत केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.