Goa Robotics Festival: गोव्यात जानेवारीत आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स महोत्सव 2024 चे आयोजन

25 ते 28 जानेवारी दरम्यान हा महोत्सव नियोजित आहे.
Goa Robotics Festival
Goa Robotics FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

Goa International Robotics Festival: गोव्यात येत्या वर्षात (2024) गोवा आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभाग, गोवा सरकार, InfinityX STEM फाउंडेशनच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. 25 ते 28 जानेवारी दरम्यान हा महोत्सव नियोजित आहे.

गोवा आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स महोत्सव 2024 मध्ये प्रतिष्ठित फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया रोबोटिक्स चॅम्पियनशिप, फर्स्ट लेगो लीग ओपन चॅम्पियनशिप आणि फर्स्ट टेक चॅलेंज (FTC) रोबोटिक्स स्पर्धा आयोजित केल्या जातील.

माहिती, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनचे संचालक IAS पी अभिषेक, InfinityX STEM Foundation आणि FIRST INDIA अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विन बी सावंत यांनी गोव्याचे माहिती, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि मंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

“गोवा आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स महोत्सव STEM शिक्षणाला चालना देण्यासह शैक्षणिक आणि वैयक्तिक वाढीसाठी एक उत्तम मार्ग आहे. तसेच, विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि आत्मविश्वास आणि जीवनातील महत्त्वाच्या कौशल्यांचे वाढीसाठी पायाभूत ठरणार आहे,” असे खंवटे म्हणाले.

FTC रोबोटिक्स स्पर्धा, हा महोत्सवाचा एक अविभाज्य भाग आहे, हा भारतातील वार्षिक कार्यक्रम आहे जो इयत्ता 7-12 मधील विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यामध्ये 12 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थी सहभाग घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com