Dabolim Airport: 'दाबोळी' विमानतळाची उंच भरारी! पटकावला द्वितीय क्रमांक; जागतिक क्रमवारीत मिळवले मानाचे स्थान

Dabolim Airport Global Ranking : विमानतळ संचालक फ्लाइट लेफ्टनंट आकाश दीप यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना, संपूर्ण टीम आणि संबंधित घटकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे सांगितले.
Dabolim Airport Global Recognition
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Dabolim Airport Global Recognition : गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (दाबोळी) याने एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलच्या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सर्व विमानतळांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला असून जागतिक क्रमवारीत ५९वे स्थान पटकावले आहे.

हे मानांकन पूर्णपणे प्रवाशांच्या प्रत्यक्ष अभिप्रायावर आधारित असून, विमानतळावरील सेवा, स्वच्छता, कर्मचाऱ्यांचे सौजन्य आणि एकूण प्रवास अनुभव यांचा विचार करण्यात येतो. विमान वाहतूक क्षेत्रात हा पुरस्कार अत्यंत मानाचा समजला जातो.

Dabolim Airport Global Recognition
Goa Tourism: पर्यटनात गोव्याला मिळाला दुहेरी मुकूट! गोवा ‘डेस्टिनेशन ऑफ द इयर’; खंवटे ‘टुरिझम मिनिस्‍टर ऑफ द इयर’

विमानतळ संचालक फ्लाइट लेफ्टनंट आकाश दीप यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना, संपूर्ण टीम, एअरलाईन भागीदार आणि संबंधित घटकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे सांगितले.

Dabolim Airport Global Recognition
Goa News: गोव्यासाठी आनंदाची बातमी! राज्याला ‘स्मार्ट गव्हर्नन्स’ सुवर्ण पुरस्कार; दिल्ल्लीत मंत्री गुदिन्होंनी स्वीकारला सन्मान

भविष्यात सेवा अधिक उंचावून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. या यशामुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळून आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com