Goa Success Story: गोव्यातील 'पांडुरंगा'ची कमाल! जायफळांच्‍या टरफलांपासून बनवले स्‍वादिष्‍ट जॅम; देशातील पहिले उत्पादक

Goa Farmer Pandurang Patil: रिवण येथील बागायतदार पांडुरंग पाटील यांनी या टरफलांचाही चांगला उपयोग होऊ शकतो हे सिद्ध करत त्‍यापासून स्‍वादिष्‍ट असे जॅम बनविले आहे.
Goa Success Story: गोव्यातील 'पांडुरंगा'ची कमाल! जायफळांच्‍या टरफलांपासून बनवले स्‍वादिष्‍ट जॅम; देशातील पहिले उत्पादक
Published on
Updated on

Goa Farmer Success Story

पणजी : जायफळाचे वरचे टरफल (कवच) हे उपयोगी नसल्‍याचे कारण सांगून बाहेर फेकले जायचे, परंतु अभिनव शेतीसाठी प्रसिद्ध असलेले रिवण येथील बागायतदार पांडुरंग पाटील यांनी या टरफलांचाही चांगला उपयोग होऊ शकतो हे सिद्ध करत त्‍यापासून स्‍वादिष्‍ट असे जॅम बनविले आहे. कच्च्या जायफळांच्‍या टरफलांपासून जॅम बनविणारे ते देशातील पहिलेच उत्‍पादक बनले आहेत.

गोवा सरकारचा कृषीभूषण आणि भारतीय कृषी संशोधन संस्‍थेकडून अभिनव शेतकरी म्‍हणून पुरस्‍कार प्राप्‍त झालेले पाटील हे मागची पाच वर्षे हा जॅम बनवित असून आतापर्यंत हा जॅम ते आपल्‍या रिवण येथील फार्मवरच विकत होते. मात्र आता हा जॅम गोव्‍याच्‍या बाजारपेठेतही आणण्‍याचे ठरविले आहे. या वर्षी त्‍यांनी ५०० किलो जॅम बनविलेला असून हे एक आश्‍चर्य असेच मानले जाते.

Goa Success Story: गोव्यातील 'पांडुरंगा'ची कमाल! जायफळांच्‍या टरफलांपासून बनवले स्‍वादिष्‍ट जॅम; देशातील पहिले उत्पादक
Apple Farming In Goa: जर्मनी रिटर्न इंजिनिअरने केली कमाल, उष्ण गोव्यात फुलवली सफरचंदाची शेती Watch

यासंबंधी पाटील यांना विचारले असता, जायफळाचे पीक गोवा आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. नारळाच्‍या पिकाबरोबरच घेतले जाणारे संयुक्‍त पीक म्‍हणून जायफळांची लागवड केली जाते. सुरुवातीला या जायफळाच्‍या झाडाला एक फळ येते आणि या फळातील आतील गर परिपक्‍व झाल्‍यावर या फळाचे वरचे टरफल फुटून तो गर बाहेर येतो. याचा वरचा भाग मसाल्‍यात ‘तिकी’ म्‍हणून वापरला जातो. तर आतील गर जायफळ म्‍हणून मसाल्‍यात वापरला जातो अशी माहिती त्‍यांनी दिली.

पाटील म्‍हणाले की, जायफळाचे टरफल फोडून गर बाहेर आल्‍यावर शेतकरी हे कवच बाहेर फेकून द्यायचे. मात्र हे टरफलही खाण्‍यायोग्‍य आहे ही माहिती असूनही त्‍याचा काही उपयोग केला जात नसे. मात्र मी काही संशोधन केल्‍यानंतर या जाळफळ कच्चे असताना त्याचा वापर करणे शक्‍य असल्याचे मला कळून चुकले. साखरेच्‍या पाकात जर कच्च्या जाळफळांच्या टरफलांचा लगदा मिसळला तर त्‍याचे स्‍वादिष्‍ट जॅम तयार होते हे लक्षात आले. त्‍यानंतर मी यावर प्रयोग करत गेलो. आज आमचे जॅम सगळीकडे प्रसिद्ध आहे.

Goa Success Story: गोव्यातील 'पांडुरंगा'ची कमाल! जायफळांच्‍या टरफलांपासून बनवले स्‍वादिष्‍ट जॅम; देशातील पहिले उत्पादक
Salt Farming In Goa: ...तर मिठागर चालविणारी शेवटची पिढी! ज्योकिम काब्राल

उत्‍पादन लवकरच बाजारात आणणार

पाटील म्‍हणाले की, कच्च्या जायफळाच्‍या टरफलांपासून जॅम फक्‍त श्रीलंकेत केला जातो. भारतात असा कुणी प्रयोग केला आहे हे माझ्‍या तरी वाचनात आलेले नाही. मागची पाच वर्षे आम्‍ही हे उत्‍पादन बनवीत आहोत. आतापर्यंत माझ्‍या फार्मला भेट देणारे पर्यटक गोव्‍याची आठवण म्‍हणून हा जॅम घेऊन जात आहेत, त्‍यामुळे हे उत्‍पादन आम्‍ही बाजारात आणले नव्‍हते. मात्र आता हे उत्‍पादन बाजारातही आणण्‍याचा आमचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com