Goa Illegal Business: गोव्यात बेकायदेशीर व्यवसाय नकोच- माविन गुदिन्हो

Goa Illegal Business: गोवा माईल्सविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार आहे.
Goa Illegal Business
Goa Illegal BusinessDainik Gomantak

Goa Illegal Business: देशभरात ओला, उबेर ॲप ॲग्रीगेटर व्यवसाय बेकायदेशीरपणे चालत असल्याचे यापूर्वी आपण सांगितले आहे. कर्नाटक सरकारने आता या दोन्ही बेकायदेशीर सेवांवर बंदी घातली असल्याने राज्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी हे बेकायदेशीर व्यवसाय गोव्यात आणू नयेत, असा इशारा ऑल गोवा बस संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांना दिला आहे.

आझाद मैदानावर काल शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ताम्हणकर म्हणाले, की आम्ही सरकारला प्रत्येक बाबींविरोधात कायदेशीर लढाई लढत असल्याचे दाखवून दिले आहे. गोवा माईल्सविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार आहे.

Goa Illegal Business
Goa Casino: 'GCZMA'ला कॅसिनोंकडून आलेले अर्ज अपूर्णावस्थेत!

मुख्यमंत्र्यांनी कदंब आणि खासगी बसेस एकाच छताखाली आणून पुढील सीमोल्लंघन करू, असे जाहीर केले आहे. त्यावर ताम्हणकरांनी सवाल उपस्थित केले आहेत. आम्ही कर्ज काढून व्यवसाय करीत आहोत. आमची सबसिडीची रक्कमही अजून दिली नाही. अगोदर आमचे पैसे द्यावेत मग घोषणा कराव्या, असेही त्यांनी उपरोधिक सल्ले दिले.

‘वाहतुकीविषयी आमच्याशी चर्चा करावी’

मुख्यमंत्री, वाहतूकमंत्री जी बेजाबदारपणे उदाहरणे देतात, ती चुकीची आहेत. याप्रसंगी त्यांनी गुदिन्हो यांच्यावर जोरदार टीका केली. खासगी वाहतुकीविषयी जे काही निर्णय घेणार आहात, त्याविषयी किमान आमच्याकडे चर्चा करावी आणि मगच निर्णय घ्यावेत, असे सांगून ताम्हणकर म्हणाले की, जीएमआरचा मोपा विमानतळाचा सरकारला काहीच फायदा नाही.

Goa Illegal Business
Goa Petrol Price: गोव्यात पेट्रोल-डिझेल महागले? जाणून घ्या इंधनाचे दर

खासगी विमानतळ असल्याने सरकारला वर्षाकाठी जी काही रक्कम मिळायची आहे ती त्यांच्याकडून मिळेल. त्यामुळे तेथील कंपनीच्या हातात सर्व अधिकार असणार आहेत, हे लक्षात घ्यायला हवे, असेही सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले.

माविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री-

राज्यातील टॅक्सीचालक राजी हो, न हो, मी माझ्या निर्णयावर ठाम असून कोणत्याही स्थितीत पुढच्या आठवड्यात टॅक्सी अॅपसेवा सुरू करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com