IFFIRegistration: 'IFFI 2024' च्या नोंदणीला जोरदार प्रतिसाद! गोवा विशेष विभागासाठी प्रवेशिका आमंत्रित; इथे करा नोंदणी...

Goa IFFI 2024: ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली असून, नऊ दिवसांत १४०० प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. तसेच गोवा विभागासाठी मनोरंजन संस्थेने चित्रपट प्रवेश आमंत्रित केले आहेत.
International Film Festival of India
International Film Festival of IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली असून, नऊ दिवसांत १४०० प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. तसेच गोवा विभागासाठी मनोरंजन संस्थेने चित्रपट प्रवेश आमंत्रित केले आहेत.

वार्षिक चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होणार असून, विशेष गोवा विभाग कोकणी आणि मराठी फिचर आणि नॉन-फिचर फिल्म्ससाठी प्रवेशिका आमंत्रित केल्या आहेत. प्रवेशिका ३० ऑक्टोबरपर्यंत जमा करायच्या आहेत. खालील संकेतस्थळावर प्रवेशिका उपलब्ध आहेत.

https://esg.co.in/entries-for-special-goan-section-feature-non-feature-films-for-the-55th-iffi-2024/

International Film Festival of India
IFFI Goa: मडगावात इफ्फीची तयारी सुरू; तांत्रिक अधिकाऱ्यांकडून मडगाव रवींद्र भवनची पाहणी

चित्रपट प्रेमींकरिता प्रतिनिधी नोंदणीसाठी जीएसटीसह एक हजार रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, विद्यार्थी वर्गास ही नोंदणी मोफत आहे. फिल्म फेस्टिव्हलच्या बरोबरीने चालणाऱ्या एनएफडीसी फिल्म बाजारच्या १८ व्या आवृत्तीचीही नोंदणी सुरू झाली आहे. filmbazaarindia.com या संकेतस्थळावर प्रतिनिधी नोंदणीसाठी १८ हजार रुपये मोजावे लागतील. २५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत नोंदणीसाठी २० हजार रुपये, तर ऑन द स्पॉट नोंदणी १२ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत प्रति प्रतिनिधी शुल्क २५ हजार रुपये आकारले जाईल. विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली असून, १९ नोव्हेंबरपर्यंत प्रति विद्यार्थीसाठी ९ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com