IFFI 2022 Updates: पहिल्‍या 2 मराठी सिनेमांसाठी 40 लाखांची अनुदान योजना

IFFI 2022 Updates: डॉ. ढाकणे : सिनेउद्योगासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी अग्रेसर
IFFI 2022 |Goa News
IFFI 2022 |Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

IFFI 2022 Updates: भारतीय चित्रपटसृष्टी आणि उद्योगासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ कायम सक्रिय आहे. मराठी चित्रपटांची निर्मिती मोठ्या संख्‍येने व्‍हावी यासाठी महामंडळाच्या वतीने पहिल्या दोन चित्रपटांना निर्मात्यांना 30 ते 40 लाख रुपयांचे अनुदान देण्‍याची योजना सुरू आहे. शिवाय चित्रनगरीच्या भाड्यात विशेष सवलत देण्यात येतेय, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

सिनेउद्योगाच्या वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्‍यात येत असल्याची माहिती डॉ. अविनाश ढाकणे यांनी देऊन मराठी सिनेमांचे प्रमोशन सुरूच आहे, असे ते म्‍हणाले. इफ्‍फीतील ‘फिल्‍म बझार’मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ सहभागी झाले आहे.

डॉ. ढाकणे म्हणाले की, 1977 साली स्थापन झालेल्या या महामंडळाच्या वतीने उभारलेली चित्रनगरी 500 एकरहून अधिक जागेत पसरली आहे. येथे 15हून अधिक छोटे-मोठे स्टुडिओ उभारण्यात आले आहेत.

या स्टुडिओंचा बॉलिवूड आणि इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटनिर्मितीसाठी फायदा होत आहे. सिनेमांच्या मार्केटिंगसाठी महामंडळाने महाराष्ट्र आणि बॉलिवूड या संकल्‍पनेवर आधारीत कार्यालयाची आकर्षक केलेल्या सजावटीमुळे ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, असेही ढाकणे म्‍हणाले.

IFFI 2022 |Goa News
Pankaj Tripathi On South Films: पंकज त्रिपाठींनी साऊथ चित्रपटांच्या ऑफर्स का नाकारल्या, इफ्फीत केला खुलासा

चार मराठी चित्रपटांची निवड :

इफ्‍फीसाठी पोटरा, तिचं शहर होणं, राख आणि पल्याड या चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. पोटरा, राख चित्रपटाचे प्रदर्शन झाले असून त्‍यांना चांगला प्रतिसाद मिळाला. अन्‍य दोन सिनेमांकडूनही तशीच अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com