I-League Football Tournament: चर्चिल ब्रदर्सचा दोन गोलने पराभव

आय-लीग: राजस्थान युनायटेडने नोंदविला पहिला विजय
 I-League Football Tournament
I-League Football TournamentDainik Gomantak

I-League Football Tournament राजस्थान युनायटेडने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत यावेळच्या मोसमातील पहिला विजय नोंदविताना गोव्याच्या माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला 2-0 फरकाने पराभूत केले. सामना सोमवारी हैदराबाद येथील डेक्कन अरेनावर झाला.

चर्चिल ब्रदर्सचा हा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. अगोदरच्या लढतीत अनुक्रमे बरोबरी व विजय अशी कामगिरी केलेल्या गोव्यातील संघाचे चार गुण कायम राहिले. त्यांची आता सहाव्या स्थानी घसरण झाली.

लालचुंगनुंगा छांगटे याने पाचव्या, तर रिचर्डसन डेन्झेल याने ३८व्या मिनिटास केलेल्या प्रत्येकी एका गोलमुळे राजस्थान युनायटेडने विजयाच्या पूर्ण तीन गुणांची कमाई केली. त्यांना १३ संघांत आता दहावा क्रमांक मिळाला आहे. राजस्थानला सुरवातीच्या तिन्ही सामन्यांत पराभूत व्हावे लागले होते.

 I-League Football Tournament
Cooch Behar Trophy 2023: गोव्याची कुचबिहार करंडक मोहीम 17 नोव्हेंबरपासून

स्पोर्टिंग क्लबचा मोठा विजय

आय-लीगच्या तृतीय श्रेणीत गोव्याच्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने भोपाळमधील जागरण लेक सिटी विद्यापीठ मैदानावर स्पोर्टिंग क्लबने न्यू फ्रेंड्स क्लब-दांतेवाडा संघाला 10-0 फरकाने धुव्वा उडविला.

सोमवारी झालेल्या लढतीत स्पोर्टिंग क्लबसाठी लॉईड कार्दोझ याने तीन, जॉयसन गावकार व आयव्हन कॉस्ता यांनी प्रत्येकी दोन, मार्कुस मास्कारेन्हास, जोएल कुलासो व लॉईड मास्कारेन्हासस यांनी प्रत्येकी एक गोल केला. अ गटात आता स्पोर्टिंगचे तीन लढतीतून 11 गुण झाले आहेत.

 I-League Football Tournament
चिखलीत मंगळवारपासून U12 क्रिकेट स्पर्धा, गोवा आणि कर्नाटकातील 7 संघ आमने-सामने

धेंपो क्लबची विजयी सलामी

आय-लीगच्या तृतीय श्रेणीत एला-जुने गोवे येथील मैदानावर धेंपो स्पोर्टस क्लबने जेप्पियार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी संघावर 2-0 फरकाने मात केली. माजी आय-लीग विजेत्यांसाठी पहिला गोल ॲरिस्टन कॉस्ता याने 37 व्या मिनिटास केला. नंतर 53 व्या मिनिटास सेईगौमांग डौंगल याने दुसरा गोल नोंदविला. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सोमवारी धेंपो क्लबने विजयाची नोंद केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com