Cooch Behar Trophy 2023: गोव्याची कुचबिहार करंडक मोहीम 17 नोव्हेंबरपासून

Cooch Behar Trophy 2023 19 वर्षांखालील क्रिकेट: पुंडलिक नाईक याच्याकडे संघाचे नेतृत्व कायम
Cooch Behar Trophy 2023
Cooch Behar Trophy 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Cooch Behar Trophy 2023 कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील गोव्याची मोहीम येत्या शुक्रवारपासून (ता. 17) सुरू होईल. त्यांचा स्पर्धेतील पहिला चार दिवसीय सामना मुंबई येथे मुंबई संघाविरुद्ध होईल.

स्पर्धेत गोव्याचा ‘अ’ गटात समावेश असून चंडीगड, त्रिपुरा, पंजाब व विदर्भ हे अन्य संघ आहेत. विनू मांकड करंडक एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी कर्णधारपद भूषविलेल्या पुंडलिक नाईक याच्याकडे गोव्याचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत गोव्याचा संघ तीन सामने घरच्या मैदानावर खेळेल.

Cooch Behar Trophy 2023
Inter-Divisional Senior Women's T-20 Cricket Tournament: दक्षिण विभाग संघाच्या कर्णधार पदाची धुरा शिखा पांडेकडे

गोव्याचा 17 सदस्यीय संघ-

पुंडलिक नाईक (कर्णधार), शंतनू नेवगी, वीर यादव, निसर्ग नागवेकर, यश कसवणकर (उपकर्णधार), दिशांक मिस्कीन, जीवन चित्तेम (यष्टिरक्षक), युवराज सिंग, स्वप्नील गावकर, कौस्तुभ पिंगुळकर, रुद्रेश शर्मा, दर्शन महेंद्रकर, शिवेन बोरकर, दर्पण पागी, विराज नाईक, महंमद रेहान, निश्चय नाईक.

स्पर्धेतील गोव्याचे वेळापत्रक-

विरुद्ध मुंबई, 17 नोव्हेंबरपासून (अवे), विरुद्ध चंडीगड- 24 नोव्हेंबरपासून (होम), विरुद्ध त्रिपुरा, 1 डिसेंबरपासून (होम), विरुद्ध पंजाब, 8 डिसेंबरपासून (अवे), विरुद्ध विदर्भ, 15 डिसेंबरपासून (होम).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com