

पणजी: मनुष्यबळ विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार आता सहाव्या वेतन आयोगाच्या समकक्ष पगार देणार आहे. याबाबतचा आदेश लवकरच काढला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मनुष्यबळ विकास महामंडळातर्फ सरकारी खात्यातील रिक्त झालेल्या किंवा असलेल्या जागांनुसार ती पदे भरण्याचे काम केले जाते. त्यात ऑफिस सहायक, सुरक्षारक्षक, चालक, निरीक्षक अशी व इतर पदे भरली जातात. या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदाप्रमाणे महामंडळ १४ हजार, १८ हजार रुपयांपर्यंत वेतन देते.
काही आठवड्यांपूर्वी एक हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती महामंडळाने केली आहे. सरकारने मंजुरी देताच महामंडळ रिक्त जागानुसार जाहिराती काढून पदे भरते, लवकरच काही पदांची भरती केली जाणार आहे. कायमस्वरूपी सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जाते.
मात्र महामंडळाअंतर्गत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना कमी वेतनावर काम करावे लागते. या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला जाणार नसला तरी सहाव्या वेतन आयोगाच्या समकक्ष वेतन दिले जाईल. यामुळे महामंडळाच्या जाहिरातीनुसार रिक्त जागांसाठी गुणवत्ताधारक उमेदवार अर्ज करतील, अशी अपेक्षा सरकारला वाटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.