Ganesh Chaturthi 2023: सप्टेंबर अर्ध्यावर तरी ऑगस्टचे वेतनच नाही; 'मनुष्यबळ' च्या 8 हजार कर्मचाऱ्यांना चतुर्थीची चिंता

Ganesh Chaturthi 2023: बाप्पा कधी पावणार? मनुष्यबळ विकास महामंडळाकडून ऑगस्ट महिन्याचे वेतन थकले
Salary
SalaryDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Human Resource Development Corporation - दर महिन्याचे वेतन हाती मिळाल्यानंतर त्यावर गुजराण करणाऱ्या गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या ८ हजार कर्मचाऱ्यांना यंदा गणेश चतुर्थी कशी साजरी करावी, याची चिंता सतावू लागली आहे.

कारण सप्टेंबर महिना निम्मा सरत आला, तरी त्यांना ऑगस्टचे वेतन मिळालेले नाही. वेतन मिळणार कधी आणि चतुर्थीची तयारी करायची कधी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.

सरकारी नोकरी मिळत नाही, म्हणून अनेकजण नाईलाजास्तव या महामंडळाकडे वळतात. प्रामुख्याने विविध सरकारी खाती, महामंडळे आणि आस्थापने यांना सुरक्षा रक्षक पुरवणे आणि स्वच्छता कर्मचारी पुरवणे अशी कामे महामंडळ करते.

त्यासाठी महामंडळ त्यांना प्रशिक्षण देते. हे महामंडळ सरकारी असल्याने येथे नोकरी मिळवण्यासाठी एकेका पदासाठी अनेकजण अर्ज करतात. गेल्या महिन्यात महामंडळाने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यावेळी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या कार्यालयासमोर मोठी रांग लागली होती.

या महामंडळाने ऑगस्ट महिन्याचे वेतनच अदा केलेले नाही. सुरक्षा रक्षकांना मासिक १६ हजार, तर स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक १४ हजार रुपये वेतन दिले जाते. नव्याने रुजू झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना १२ हजार रुपये वेतन मिळते.

या तुटपुंज्या वेतनावरच त्यांना गुजराण करावी लागते. तेही वेतन वेळेवर न मिळाल्याने तोंडावर आलेली गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी उसनवारी करावी लागते की काय, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

अधिकाऱ्यांनी चोळले जखमेवर मीठ

गणेश चतुर्थी येत्या मंगळवारी असली तरी त्याआधी बाजारहाट करण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे खात्यात वेतन कधी जमा होणार, या प्रतीक्षेत ते आहेत.

त्यातच काहीजणांना प्रशिक्षणासाठी पाठवले आहे. त्यांनी वेतनाचा विषय वरिष्ठांकडे काढला असता, तुम्हाला चतुर्थीच्या आदल्या दिवशी वेतन मिळाले तरी पुरे, असे उत्तर मिळाल्याने ते नाराज झाले आहेत.

Salary
Vijai Sardesai: ''खाकी कलंकितच, भ्रष्ट पोलिसांची मी यादी उघड करू शकतो'', आमदार सरदेसाईंचा रोखठोक इशारा

‘दयानंद’चे जुलैचे अनुदान जमा

समाजकल्याण खात्याने दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत जुलै महिन्याचा आर्थिक लाभ राज्यभरातील लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केला आहे. तसेच गुरुवारी ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभ जमा केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com