Goa HSC Result 2021: सासष्टीचा 99.31 टक्के निकाल

मडगाव येथील श्री दामोदर विज्ञान उच्चमाध्यमिक, कार्मेल उच्चमाध्यमिक नुवे, लॉयला उच्च माध्यमिक व प्रेझेंटेशन कॉनवेंट उच्च माध्यमिकाचा 100 टक्के निकाल लागला.
99.31 percent result of higher secondary in Salcete  taluka
99.31 percent result of higher secondary in Salcete talukaDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा : गोवा (Goa)माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी बारावीचा निकाल जाहीर केला. सासष्टी तालुक्यात 99.31 टक्के निकाल लागला. या तालुक्यातील 17 उच्च माध्यमिक शाळातील 4071 पैकी 4043 विद्यार्थी (Students) उत्तीर्ण झाले. मडगाव येथील श्री दामोदर विज्ञान उच्चमाध्यमिक, कार्मेल उच्चमाध्यमिक नुवे, लॉयला उच्च माध्यमिक व प्रेझेंटेशन कॉनवेंट उच्च माध्यमिकाचा 100 टक्के निकाल लागला. श्री दामोदर उच्च माध्यमिकातर्फे 254 विद्यार्थ्यांपैकी 254 विद्यार्थी उत्तिर्ण झाले.

99.31 percent result of higher secondary in Salcete  taluka
Goa: सर्वोच्च न्यायालयाचा गोवा सरकारला दणका

कार्मेल उच्च माध्यमिकातर्फे 365 विद्यार्थी बारावीत होते. त्यातील 116 कला, 64 वाणिज्य, 106 विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमात 79 विद्यार्थी होते. लॉयलातर्फे 47 कला व 96 विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी उत्तिर्ण झाले. प्रेझेंटेशन कॉनवेंटमध्ये 57 कला व 82 विज्ञान शाखेतील विद्यार्थी उत्तिर्ण झाले. बोर्डा येथील सरकारी मल्टिपर्पज उच्च माध्यमिकातील वाणिज्य 101, विज्ञान 64, व्यावसायिक 53 पैकी सर्व विद्यार्थी उत्तिर्ण झाले. केवळ कला शाखेतील 89 पैकी 86 विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने त्यांचा 100 टक्के निकाल हुकला.

99.31 percent result of higher secondary in Salcete  taluka
Goa Politics : विद्यार्थ्यांना मोफत व्हायफाय इंटरनेट सुविधा

नावेली येथील रोझरी उच्च माध्यमिकातील 764 पैकी 760 विद्यार्थी उत्तिर्ण झाले. कला शाखेत 165, वाणिज्य 230, विज्ञान 212 व व्यावसायिक अभ्यासक्रमातील 153 विद्यार्थी उत्तिर्ण झाले. मडगाव येथील विद्या विकास आरएमएस उच्च माध्यमिक शाळेत वाणिज विभागात 227 पैकी 226 व व्यावसायिक अभ्यासक्रमात 66 पैकी 66 विद्यार्थी उत्तिर्ण झाले.गुडी पाड्डे येथील श्री दामोदर उच्च माध्यमिकात 370 पैकी 360 विद्यार्थी उत्तिर्ण झाले. वेर्णा येथील फादर आग्नेल उ्च्च माध्यमिकमध्ये 275 पैकी 272 विद्यार्थी उत्तिर्ण झाले. त्यांच्या वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के निकाल लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com