Goa Hotel Labor Shortage: हॉटेल व्यवसायाला कामगार टंचाईचे ग्रहण! ऐन सीझनमध्ये मालकांसमोर 'वेटिंग'चं मोठं संकट, व्यावसायिक हवालदिल

Goa Hotel Industry Crisis: व्‍यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि त्‍यातच वाढलेले दर यामुळे राज्‍यातील अनेक हॉटेल, रेस्‍टॉरंट मालक संकटात सापडलेले असतानाच, आता त्‍यांना कामगार मिळवण्‍यासाठीही कसरत करावी लागत आहे.
Goa Hotel Industry Crisis
Goa Hotel Labor ShortageDainiak Gomantak
Published on
Updated on

पणजी: व्‍यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि त्‍यातच वाढलेले दर यामुळे राज्‍यातील अनेक हॉटेल, रेस्‍टॉरंट मालक संकटात सापडलेले असतानाच, आता त्‍यांना कामगार मिळवण्‍यासाठीही कसरत करावी लागत आहे.

कुकपासून वेटरपर्यंतच्‍या कामगारांकडून भरघोस वेतनाची मागणी होत असल्‍याने आणि त्‍यांचाही तुटवडा भासत असल्‍यामुळे अनेक हॉटेल, रेस्‍टॉरंटच्‍या मालकांनी आपापली आस्‍थापने लिज पद्धतीवर इतरांना देण्‍यास सुरवात केलेली आहे. ‘राज्‍यातील हॉटेल, रेस्‍टॉरंटमध्‍ये प्रामुख्‍याने इतर राज्‍यांतील कामगार काम करतात.

Goa Hotel Industry Crisis
Anjuna Illegal Hotel: मुख्‍य सचिवांसह 7 प्रतिवादींना नोटिसा, हणजूण येथील बेकायदा हॉटेल प्रकरणी याचिकेची दखल

परंतु, मध्‍यंतरीच्‍या काळात व्‍यावसायिक सिलिंडरचा झालेला तुटवडा आणि त्‍यानंतर वाढलेले दर यामुळे अनेक कामगार आपापल्‍या राज्‍यांमध्‍ये परतले आहेत. या व्‍यवसायात गोमंतकीय कामगारांची कमतरता आहे. त्‍यामुळे सध्‍या कार्यरत असलेल्‍या इतर राज्‍यांतील कामगारांकडून वाढीव वेतनाची मागणी केली जात आहे. सद्यस्‍थिती पाहता त्‍यांची वेतनाबाबतची मागणी पूर्ण करणे अनेकांना शक्‍य होत नाही. दुसरीकडे, कामगारही मिळत नाहीत. त्‍यामुळे अनेकांनी आपापली हॉटेल, रेस्‍टॉरंट लिजवर देण्‍यास सुरवात केलेली आहे’, अशी माहिती गोवा हॉटेल मालक संघटनेचे अध्‍यक्ष गौरीश धोंड यांनी बुधवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

बहुतांशी हॉटेल्‍सनी वाढवले दर

व्‍यावसायिक सिलिंडरचे दर वाढल्‍यानंतर सोमवारपासून अनेक हॉटेल, रेस्‍टॉरंट्सनी खाद्यपदार्थांचे दर दहा ते वीस रुपयांनी वाढवलेले आहेत. काही मालकांनी दरवाढ झालेल्‍या दिवसपासूनच खाद्यपदार्थांचे दर वाढवलेले होते. कामगारांच्‍या तुटवड्यामुळे काही हॉटेल, रेस्‍टॉरंटनी राईस प्‍लेट बंद केली असून, इतर काही पदार्थही मेन्‍यू कार्डमधून हटविले आहेत. त्‍यामुळे स्‍थानिकांसह राज्‍यात येणाऱ्या पर्यटकांच्‍या खिशाला कात्री लागत आहे. सोबतच त्‍यांना आवडीच्‍या खाद्यपदार्थांवर तावही मारता येत नसल्‍याचे चित्र दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com