Goa Accident: होंडा येथे ट्रक-दुचाकी यांच्यात अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

शुक्रवारी पर्वरी आणि मालपे- पेडणे येथे कारचे दोन वेगवेगळे अपघात झाले होते.
Accident
AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident सध्या गोव्यात अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून नुकताच होंडा येथे ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाल्याचे वृत्त समोर येतेय. तसेच या अपघातात एक युवक गंभीर जखमी तर दुचाकीस्वार जागीच मृत झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार होंडा औद्योगिक वसाहतीजवळ ट्रक आणि केटीएम दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्य झाला असुन एक गंभीर जखमी आहे. मृत झालेल्या युवकाचे नाव प्रज्वल दत्तप्रसाद धुरी (20) असुन तो पाळी वेगळे येथील रहिवासी आहे.

दुसऱ्या युवकांची अजुन माहिती उपलब्ध झालेली नाही. ट्रक चालकाला होंडा पोलिसांनी अटक केली आहे. सदर ट्रक हा होंडा पेपर मिल कंपनीचा आहे. वाळपई पोलिस साखळी येथे दाखल झाले असुन पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान काल म्हणजेच शुक्रवारी पर्वरी आणि मालपे- पेडणे येथे कारचे दोन वेगवेगळे अपघात झाले होते. रोज होणाऱ्या अपघातांमुकें चीनताजनक स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

Accident
Goa Crime: मानव संसाधन महामंडळातील चोरीचा प्रयत्न फसला; सुरक्षा रक्षकांच्या सतर्कपणामुळे चोरटा ताब्यात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com