Goa Crime: मानव संसाधन महामंडळातील चोरीचा प्रयत्न फसला; सुरक्षा रक्षकांच्या सतर्कपणामुळे चोरटा ताब्यात

सुरक्षा रक्षक अजित वेळीप आणि संदेश गावकर यांनी सापळा रचत चोराला रंगेहात पकडत चोरीचा प्रयत्न हाणून पाडला.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime: सुरक्षा रक्षकांच्या सतर्कपणामुळे गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या कार्यालयातील चोरीचा प्रयत्न फसला आहे.

या संबंधी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मथनी सालदान्हा या प्रशासकीय अपार्टमेंटमधील गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या कार्यालयात शिरून एका चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला.

मात्र ड्युटीवर असणारे सुरक्षा रक्षक अजित वेळीप आणि संदेश गावकर यांनी सापळा रचत चोराला रंगेहात पकडत चोरीचा प्रयत्न हाणून पाडला.

चोर शौचालय परिसरातून सर्व प्लंबिंग फिटिंग्ज आणि नळ काढण्याचा प्रयत्न करत होता, गस्तीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या घटनेविषयी मिळालेली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे- कार्यालयातील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी इचित फलदेसाई यांना कार्यालयातील प्रत्येक मजल्यावर चोरी होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता.

त्यामुळेच त्यांनी त्याला पकडण्याचा प्लॅन तयार केला. विशेष म्हणजे शनिवार सुट्टीच्या दिवशी कार्यालये बंद असल्याने चोरीचा प्रकार घडणार असल्याचा त्यांना संशय होता. त्यामुळे त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना हाताशी धरून नियोजन केले.

कार्यालयाचे सुरक्षा रक्षक सिव्हिल कपड्यांमध्ये तैनात करून त्यांना स्वच्छतागृह परिसरात फेऱ्या मारण्यास सांगितले. तसेच फळदेसाई यांनी सुट्टीच्या दिवशी फक्त एकच गेट ओपन ठेवण्याचे ठरवले. अशारीतीने सापळा रचत पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या चोरट्याला पकडले.

गोव्यात सध्या वाध्य अगुन्हेगारीचे चित्र निर्माण झाले असून अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतीच होंडा येथे ट्रक आणि दुचाकी यांच्या अपघात झाल्याची माहिती हाती आली असून या अपघातात दुचाकीचालक जागीच गतप्राण झाल्याची समजतेय

Goa Crime
National Games Goa 2023: सेनादलाच्या वेटलिफ्टरला सुवर्णपदक; तर गोव्याच्या शुभम वर्मा याला रौप्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com