खांद्यावर हात, जबरदस्तीनं सेल्फी! हरमल बीचवर विदेशी महिला पर्यटकांसोबत तरूणांकडून गैरवर्तन, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Goa Tourist Saftey: गोवा हे देशातील सर्वात लोकप्रिय आणि जागतिक पातळीवर प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
Goa Tourist Saftey
Goa Tourist SafteyDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा हे देशातील सर्वात लोकप्रिय आणि जागतिक पातळीवर प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी हजारो देशी आणि परदेशी पर्यटक येथे समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेण्यासाठी, स्थानिक संस्कृती अनुभवण्यासाठी आणि निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येतात. मात्र, पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलेल्या या राज्यात काही पर्यटकांकडून गैरवर्तनाच्या घटना घडत असल्याने गोव्याची आंतरराष्ट्रीय प्रतिमा धोक्यात येत आहे.

अशाच एका धक्कादायक घटनेत हरमल बीचवर काही देशी पर्यटकांकडून परदेशी महिला पर्यटकांचा छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. काही भारतीय तरुणांचा गट त्या महिलांच्या परवानगीशिवाय त्यांच्या जवळ जाऊन फोटो आणि व्हिडिओ घेत होता.

Goa Tourist Saftey
Goa Vs Punjab: गोव्याचे पंजाबला दमदार प्रत्युत्तर! 92 धावांची अभेद्य सलामी; 'सुयश'चे अर्धशतक

इतकंच नव्हे, तर या महिलांच्या संमतीशिवाय त्यांच्याजवळ येत, खांद्यावर हात ठेवून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना काही तरूण दिसले. या घटनेचा व्हिडिओ एका स्थानिकाने चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर केला, जो काही तासांतच व्हायरल झाला.

Goa Tourist Saftey
Goa Opinion : आमच्या टेकड्या सपाट होत आहेत, नद्या प्रदूषित होत आहेत, मासेमारीच्या जाळ्यातून सूटून 'गोवा' इंटरनेटच्या जालात अडकला आहे

स्थानिक नागरिकांनी अशा घटनांमुळे गोव्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यांनी प्रशासनाला बीच परिसरात कडक देखरेख ठेवण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा गोव्यात पर्यटकांच्या वर्तनाबाबत नियम कडक करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com