Goa Handicrafts: सांगा हो आम्ही कसं जगायचं...

हस्तकलाकार सोनू शेटगावकर यांची कैफियत (Goa Handicrafts)
सोनू शेटगावकर यांची कलाकृती (Goa Handicrafts)
सोनू शेटगावकर यांची कलाकृती (Goa Handicrafts)दैनिक गोमान्तक
Published on
Updated on

Goa Handicrafts: पदरात उच्च शिक्षण असूनही सरकारी नोकरी मिळाली नाही म्हणून स्वतःच्या नशिबाला दोष न देता बेकार राहण्यापेक्षा आपल्याकडील कलेच्या माध्यमातून आपली कलाकृती (Artwork) जगाच्या नकाशावर नेवून ठेवण्यासाठी मोरजी (मरडी वाडा) येथील सोनू शेटगावकर मागच्या २० वर्षांपासून कार्यरत आहे. टाकावू वस्तूंपासून टिकावू कलाकृती करण्याच्या बाबतीत त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही.

कल्पवृक्षाच्या झाडापासून प्रत्येक वस्तूचा योग्यरीत्या वापर करून सोनू शेटगावकर हे सुंदर कलाकृती करत असतात. त्यांना मागच्या २००९ साली हस्तकलेचा (Handicraft) कला आणि सांस्कृतिक खात्याचा (Art And Culture Goa) 'युवा सृजन' पुरस्कार मिळाला आहे. नारळाच्या प्रत्येक वस्तूपासून (Coconut art) ते त्यांच्या कलातमक नजरेतून कलाकृती तयार करत असतात. टाकावू पासून टिकावू वस्तू कश्या तयार केल्या जातात, त्याविषयी कोकोआर्ट गॅलरी (Cocoart Gallary) भेट द्यावी लागेल.

सोनू शेटगावकर यांची कलाकृती
सोनू शेटगावकर यांची कलाकृती दैनिक गोमान्तक

सध्या कोरोना महामारीचा फटका (Corona epidemic) जसा राज्यातील कलाकारांना बसला त्याच पद्धतीने मोरजीतील हस्तकालाकार (Handy Craft Artist) सोनू शेटगावकर यांनाही बसलेला आहे. राज्यातील अनेक हस्तकला केंद्र विक्री प्रदर्शने बंद असल्याने कलाकारावर उपासमारीची वेळ आली आहे.

सोनू शेटगावकर यांनी आपली कैफियत मांडताना आपण मागची अनेक वर्षे या क्षेत्रात आहे. आपणास ही आवड बालपणापासून असल्याचे ते सांगतात, उच्चशिक्षण घेतल्यानंतर सरकारी नोकरी शोधली पण ती पदरी मिळाली नाही. म्हणून कलेकडे वळलों, आपल्या पत्नीची लग्नापूर्वीपासून हस्तकला महामंडळ (Handicraft Corporation) विभागात नोंद होती, ती वेगवेगळ्या प्रदर्शनात जात होती. लग्नानंतर आपणही ज्या ज्या ठिकाणी पदर्शन यात्रा भरायची त्याठिकाणी स्टॉल (Handicraft Stalls) घालत असू. त्या प्रदर्शनात वेगवेगळ्या वस्तू उपलब्ध असायचे.

आमच्या मोरजी गावात तर नारळाची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत, त्यामुळे आपण नारळाच्या प्रत्येक वस्तू पासून हस्तकला तयार करण्याचा निर्णय घेतला . आणि सरकारी नोकरीचा नाद सोडून या हस्तकलेत पूर्णपणे रमलो. टाकावूतून ह्या वस्तू मी तयार करतो व विविध ठिकाणी प्रदर्शन मांडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. हस्त कलेसाठी कोणतीच योजना नाही. सहा सात वर्षात अनेक महामंडळाची केंद्रे बंद आहे, आपल्याकडे माल आहे पण त्या मालासाठी हस्तकला महामंडळाकडून ऑर्डर मिळत नाही. काम करण्याची क्षमता आहे, मात्र आमच्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे.

सोनू शेटगावकर यांची कलाकृती
सोनू शेटगावकर यांची कलाकृती दैनिक गोमान्तक

नवीन पिढीसाठी काय सांगू ?

सोनू शेटगावकर यांनी बोलताना सांगितले, या कलेविषयी पुढच्या पिढीला काय संदेश देवू, माझ्या दोन मुली आहेत, त्या उच्चशिक्षण घेत आहेत, त्यांच्या फी भरण्यासाठी खूप अडचणी आहेत. मुली विचारतात तुला सरकारने मदत नाही केली. तर मग हाच व्यवसाय आम्ही पुढे का चालवावा असा प्रश्न ती विचारतात. आज आपल्याकडे सरकारी नोकरी असती तर सर्व व्यवहार सुरळीत झाले असते, मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या फी साठी अडचणी आल्या नसत्या. असे प्रांजळ मत सोनू शेटगावकर यांनी व्यक्त केले. गोव्याची हस्त कला जगासमोर आणण्यासाठी हि कला आत्मसात केली, जगासमोर आणली.

लेखी निवेदने दिली पण उपयोग झाला नाही

राज्यातील हस्त कलाकारांच्या मागण्या आणि समस्यांचे निवेदन कलाकारांनी सरकारला आणि स्थानिक आमदाराना दिले, त्याची आजपर्यंत कुणीच दाखल घेतली नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सोनू शेटगावकर यांची कलाकृती
सोनू शेटगावकर यांची कलाकृती दैनिक गोमान्तक

कला भवन आवश्यक

आमच्या पेडणे तालुक्यात सर्व प्रकारचे कलाकार आहेत, त्यांनी राज्य व देश पातळीवर आपले नाव नेले आहे. अश्या कलाकाराना आज पर्यत पेडणे तालुक्यात कला भवन उभारण्यासाठी सरकारला आणि आमदारानाही यश आले नाही. कलाभवनात हस्त कलेचे दालन असेल तर तिथ हस्त कलाकार आपल्या वस्तू प्रदर्शन तथा विक्रीसाठी ठेवू शकले असते. परतू कला भवनच नसल्याने कलाकाराना त्यांच्या हक्काचे स्थान उपलब्ध होत नसल्याने शेटगावकर यांनी नाराजी व्यक्त केली.

२००९ साली आपल्याला पुरस्कार मिळाला त्याचवेळी आपण कला भवनची आपण सर्वात प्रथम प्रस्थं मागणी केली होती, आपल्या मुली आपल्याला कलेसाठी मदत करतात. सरकारने आम्हाला अनुदान देण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटात सापडूनही कोणी मदत केली नाही. सरकार या काळातही पाठबळ देत नाही तर आम्ही जगायचे कसे अशी कैफियत सोनू शेटगावकर मांडत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com