Filming In Goa: गोव्यात चित्रीकरणाच्या नियमात होणार मोठा बदल, उल्लंघन केल्यास भरावा लागणार हजारोंचा दंड

पुरातत्व विभागाने गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष नियम 1980 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
Filming Norms In Goa At Heritage Site
Filming Norms In Goa At Heritage Site

Filming Norms In Goa At Heritage Site

सरकारी परवानगीशिवाय तुम्ही गोव्यातील कोणत्याही राज्य-संरक्षित स्मारक किंवा हेरिटेज साइटवर चित्रीकरण करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लवकरच 50,000 रुपये दंड भरावा लागेल.

आवश्यक परवानग्या न घेता आणि शुल्क न भरता राज्य सरकारच्या मालकीच्या कोणत्याही संरक्षित स्मारक किंवा जागेवर चित्रपटाचे चित्रीकरण केल्यास गोवा सरकारने 50,000 रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

तसेच, इतर संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी चित्रीकरण केल्यास 20,000 रुपये दंड आकरण्याचा प्रस्ताव आहे.

पुरातत्व विभागाने गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष नियम 1980 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. 8 फेब्रुवारी रोजी अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या मसुद्याच्या अधिसूचनेनुसार, सरकारने सुधारित मसुदा नियमांवर 30 दिवसाच्या आत विचार करण्यासाठी हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.

नियमांचे उल्लंघन केल्यास चित्रीकरण करण्यासाठी परवाना निलंबित करण्याचा किंवा परवाना न देण्याचा अधिकार संचालनालयाला आहे, असे प्रस्तावित दुरुस्तीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे.

संरक्षित स्मारक किंवा त्याच्या भागावर चित्रीकरणाचा प्रतिकूल परिणाम होणार नाही अशी खात्री पटल्यानंतर विभागाचे संचालक चित्रीकरणाला परवाना देऊ शकतात, असे गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष (सुधारणा) नियम 2024 नावाच्या मसुद्याच्या नियमांमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे.

सरकारच्या मालकीच्या संरक्षित स्मारके/स्थळांवर चित्रीकरणासाठी, प्रतिदिन 25,000 रुपये प्रतिदिन शुल्क भरावे लागेल तर 10,000 रुपये सुरक्षा ठेव द्यावी लागेल.

तर, इतर संरक्षित स्मारकांवर चित्रीकरणासाठी, प्रतिदिन 10,000 रुपये शुल्क आणि 2,000 रुपये परत सुरक्षा ठेव द्यावी लागेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com