Heatwave Alert: गोव्यात समुद्र किनाऱ्यावर जाताय? थेट ऊनाचा संपर्क टाळा, भरपूर पाणी प्या, सनस्क्रीन वापरा

Heatwave Alert In Goa: किनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांना समुद्राच्या कोणत्याही परिस्थितीत बचावकार्य करण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
Heatwave Alert In Goa
Heatwave Alert In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Heatwave Alert In Goa

भारतीय हवामान खात्याने या उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा अंदाज वर्तविल्यामुळे दृष्टी मरीन या राज्य सरकार नियुक्त व्यावसायिक जीवरक्षक यंत्रणेने उन्हाळी सल्ला जारी केला आहे, शिवाय उन्हाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर असताना सुरक्षित राहण्याचे सोपे मार्ग सुचवले आहेत.

राज्यभरात पुढील सात दिवस ३३ अंश सेल्सिअस ते ३५ अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा इशारा देत गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नुकतीच ‘उष्णतेच्या लाटेवर प्रतिबंधात्मक उपाय’ या शीर्षकाची सार्वजनिक सूचना जारी केली आहे.

त्या सूचनांचे या हवामान काळात पालन केले पाहिजे, असे नमूद करून दृष्टीने म्हटले आहे, थेट उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहण्यासाठी बीच छत्री आदर्श आहे.

सनबर्न आणि उष्माघात टाळण्यासाठी सनस्क्रीन वापरावी. निळा समुद्र कडाक्याच्या उन्हाळ्यात आराम देतो, समुद्रकिनारी जाणाऱ्यांनी डुबकी घेण्यापूर्वी रिप करंट, फ्लॅश करंट आणि पाण्याखालील प्रवाहांपासून सावध राहावे.

Heatwave Alert In Goa
Drinking Water Issue: भर उन्हाळ्यात पाणी नाही, सांकवाळ प्रभाग 3 मध्ये 8 दिवसांपासून नाही पाणी

किनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांना समुद्राच्या कोणत्याही परिस्थितीत बचावकार्य करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. काही मदत हवी असल्यास त्यांची मदत घेतली जावी.

समुद्रात पोहताना लाल ध्वज क्षेत्रे टाळा

सध्याच्या समुद्राच्या परिस्थितीमुळे, लाल आणि पिवळ्या रंगात चिन्हांकित केलेल्या ध्वजांमध्ये पोहावे. ते मध्यम सर्फ आणि प्रवाह दर्शवतात, तर लाल ध्वज क्षेत्रे टाळावीत, असेही त्यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mhadei Water Dispute
Leopard Cub Under Chair
Bori Sai Baba Trust Case
Goa Lifeguards Rescue 28 Fishermen
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com