Goa Education: सुरक्षित आणि सक्षम गोवा! युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण देणे हेच सरकारचे प्रमुख उद्दिष्ट; CM सावंत

Goa News: ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ एक्स्पो अँड समिट २०२५' या तीन दिवसांच्या भव्य उपक्रमाचे उद्घाटन CM प्रमोद सावंत यांनी केले.
Goa government to provide employment-oriented education to youth
Goa CM Pramod SawantGoa CM X Handle
Published on
Updated on

पणजी: बॉयलर अटेंडंटसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा बॉयलर अटेंडन्स प्रशिक्षण प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे युवकांसाठी नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होतील.

आम्ही शाळा आणि महाविद्यालयांत औद्योगिक सुरक्षा, विद्युत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व आपत्कालीन तयारी यांसारखे विविध प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. 'सुरक्षित आणि सक्षम गोवा' हे या कार्यक्रमाचे ध्येय असून युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण देणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Goa government to provide employment-oriented education to youth
Goa News: '...मग कॅसिनो पण बंद करा', हाऊजीवर बंदी घातल्याने काँग्रेस खासदार विरियातो आक्रमक

बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये 'ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ एक्स्पो अँड समिट २०२५' या तीन दिवसांच्या भव्य उपक्रमाचे उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपरोक्त विचार व्यक्त केले. या उपक्रमात कारखाने आणि बाष्पक मंत्री नीळकंठ हळर्णकर, सचिव संजित रॉड्रिग्स, मुख्य निरीक्षक अनंत पांगम आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन गोवा सरकारच्या कारखाने आणि बाष्पक निरीक्षक विभागाने केले आहे.

Goa government to provide employment-oriented education to youth
Goa Politics: भंडारी समाज भाजपपासून दुरावतोय? डॅमेज कंट्रोलसाठी प्रदेशाध्यक्ष दामू - मंत्री रवी नाईक यांच्यात खलबते

स्किल ऑन व्हील' उपक्रमाची घोषणा

मुख्यमंत्री सावंत यांनी 'स्किल ऑन व्हील" या अभिनव उपक्रमाचीही माहिती दिली. या उपक्रमांतर्गत एक मोबाइल ट्रेनिंग युनिट' पणजीहून ग्रामीण भागात जाईल आणि आधुनिक तंत्रज्ञान, साहित्य आणि शिकण्याच्या साधनांसह युवकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देईल. सुमारे २ कोर्टीचा निधी या उपक्रमासाठी मंजूर करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com