गोव्यात निष्पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी राज्य सरकारने निमलष्करी दलाच्या 14 कंपन्यांची मागणी केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गोव्यात लोकसभेच्या दोन जागा असून, या दोन जागांसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, गोव्याला निमलष्करी दलाच्या दोन कंपन्या यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.
गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) रमेश वर्मा यांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही केंद्राकडे निमलष्करी दलाच्या 14 कंपन्यांची मागणी केली आहे, त्यापैकी दोन यापूर्वीच आम्हाला देण्यात आल्या आहेत.'
मतदानाच्या दिवशी गोवा सरकारकडून केंद्रीय दलांव्यतिरिक्त आठ हजार स्थानिक पोलिस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अनेक बैठका घेतल्या. या बैठकीला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पोलिस अधिकारीही उपस्थित होते.
गोव्यात नव्याने 25,209 मतदार पहिल्यांदाच मतदान करतील, ज्यात उत्तर 12,070 आणि दक्षिण गोव्यातील 13,139 मतदारांचा समावेश आहे.
गोव्यात एकूण 11,73,016 मतदार असून त्यापैकी 5,77,958 उत्तर गोव्यात आणि 5,95,058 दक्षिण गोव्यात आहेत. त्यापैकी 5,68,501 पुरुष आणि 6,04,515 महिला मतदार आहेत.
राज्यात एकूण 1,725 मतदान केंद्रे असतील, ज्यात उत्तर गोव्यात 863 आणि दक्षिणेत 862 मतदान केंद्र असतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.