Goa Cabinet: गोव्यात अलिशान गाड्या होणार स्वस्त; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय, वाचा सविस्तर

राज्यात दिव्यांग कल्याण खात्याच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे.
Goa Cabinet Decisions
Goa Cabinet Decisions
Published on: 
Updated on: 

Goa Cabinet Decisions: गोवा राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली यात विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील नवीन करप्रणालीमुळे अलिशान गाड्या स्वस्त होणार आहेत. तसेच, राज्यात दिव्यांग कल्याण खात्याच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

१) गोव्यातील मोटार वाहन करात सुधारणा करण्यात आली असून, हाय एंड वाहनांवरील कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महागड्या अलिशान गाड्या स्वस्त होणार आहेत.

२) राज्य सरकारच्या सेवेतील क वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. योजने नुसार उर्वरीत वर्षापैकी प्रत्येक वर्षामागे दोन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मातृत्व रजा देण्याचा सरकारने निर्णय घेतला असून, गर्भपात झाल्यासही मातृत्व रजा मिळणार आहे.

३) मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिव्यांग कल्याण खाते निर्मितीची घोषणा केली असून, पुढील आर्थिक वर्षापासून दिव्यांग कल्याण खाते कार्यरत होणार आहे.

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिव्यांगासाठी स्वतंत्र खाते निर्माण करण्याबाबत वक्तव्य केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Cabinet Decisions, CM Pramod Sawant
Modi Cabinet Reshuffle 2026
Goa 97 Voters Electoral Roll
Milk Analogue in Goa Hotels
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com