जिल्हा खाण निधीवर राज्य सरकारचा ‘डल्ला’

आरटीआयद्वारे मागवलेल्या माहितीत झाले स्पष्ट
RTI
RTIDainik Gomantak

पणजी: राज्यातील खाण खात्याकडील जिल्हा खाण निधी (डिस्ट्रिक्ट मिनिरल फंड) म्हणून संकलित केला गेला जातो या निधीवर राज्य सरकारने डल्ला मारला असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या निधीतून कोरोनाच्या काळात साहित्य खरेदी करण्यात आल्याची माहिती दिली. (Goa Government's District Mining Fund Corruption: Information Revealed in RTI )

RTI
सत्तरीला वादळाचा दणका; तब्‍बल 20 वीजखांब आडवे

याबाबत माहिती देताना आरटीआय कार्यकर्ते ताम्हणकर म्हणाले की, खाणी ज्या भागात चालतात, त्या भागातील लोकांच्या कल्याणासाठी काही निधी ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्याकरिता जिल्हा खाण निधी म्हणून काही रक्कम संकलीत होत गेली. त्यात कोट्यवधी रुपये जमा झाले, परंतु 2020 मध्ये केंद्र सरकारची या निधीवर वक्रदृष्टी पडली. केंद्र सरकारातील सचिव सुशीलकुमार यांनी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना चालविण्यासाठी जिल्हा खाण निधीतून चालवावी, म्हणून पत्र लिहिले.

RTI
मुरगाव पालिकेची ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ ला सूचना

सुशिलकुमार यांचे पत्र आल्यानंतर त्यावेळी कोविड महामारी होती. 15 एप्रिल 2020 मध्ये कोविड काळात लागणारी उपकरणे खरेदी केली गेली अशी उपकरणे आणण्यासाठी एकूण 30 कोटी 87 लाख 77 हजार रुपये खर्च केले. विशेष म्हणजे खाण भागातील आमदारांनाही त्याचे काही देणेघेणे पडलेले. या निधीतून खाण भागातील सहजपणे पाच-पाच हजार रुपये देता आले असते, पण सरकार तसे करण्याचा विचारही करीत नाही.असे ते यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com