Rohan Khaunte: 'सनबर्न' आयोजकांच्या तालावर गोवा सरकार नाचणार नाही! पर्यटन मंत्र्यांचा इशारा

मोपा येथे सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाच्या चर्चांबाबत मुख्यमंत्र्यांकडे मांडणार भूमिका
Tourism Minister Rohan Khaunte on Sunburn Festival At Mopa:
Tourism Minister Rohan Khaunte on Sunburn Festival At Mopa:Dainik Gomantak
Published on
Updated on

Tourism Minister Rohan Khaunte on Sunburn Festival At Mopa: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून सनबर्न फेस्टिव्हलबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. यंदा हा महोत्सव मोपा विमानतळ येथे होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तथापि, काही पंचायतींनी येथे आयोजनास विरोध केला आहे तर काही पंचायतींचा त्यासाठी पाठिंबादेखील आहे.

दरम्यान, याबाबत पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. म्युझिक फेस्टिव्हलच्या आयोजकांना इशारा देतानाच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत स्वतःचे म्हणणे मांडणार असल्याचेही स्पष्ट केले.

Tourism Minister Rohan Khaunte on Sunburn Festival At Mopa:
Mumbai Goa Highway: गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; 'या' तारखेपासून अंमलबजावणी

रोहन खंवटे म्हणाले की, कोणताही म्युझिक फेस्टिव्हल असो, तिथे म्युझिक वाजावे. पण गोवा सरकार आणि मंत्री म्हणून मी तरी कुठल्याही म्युझिकल इव्हेंटच्या तालावर नाचणार नाही. म्युझिकल इव्हेंटची एक पद्धत आहे.

त्यांनी घोषणा केली असेल तर त्याची माहिती त्यांनाच असेल. पण त्यांना काय वाटते, याचा विचार गोवा सरकार करत बसणार नाही. गोवा सरकार त्यांच्या तालावर नाचायला तयार नाही. हे त्यांनी स्पष्टपणे समजून घ्यावे.

ते म्हणाले, मोपा विमानतळ येथे सनबर्न फेस्टिव्हल होण्याबाबतच्या बातम्या समोर आल्या आहेत. मी याबाबत माझे मत मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. मोपा विमानतलाचा अधिकाधिक विकास करण्यााचा सरकारचा प्रयत्न आहे. पण तिथे होणाऱ्या एखाद्या कार्यक्रमातून पर्यटकांनाही चुकीचा मेसेज जाता कामा नये.

Tourism Minister Rohan Khaunte on Sunburn Festival At Mopa:
Goa Accident News: बाळ्ळीत मासे वाहतूक करणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक; महिलेला नेले फरफटत

खंवटे म्हणाले, गोव्यात पहिल्यांदाच एखादा महोत्सव होतोय, अशी बाब नाही. पण जे लोक अशा फेस्टिव्हलचे आयोजन करत आहेत, त्यांना आपण सरकारला त्यांच्या तालावर नाचवू शकू, असा विचार करत आहेत, पण असे होणार नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो.

काही पंचायतींचा याला विरोध आहे, तर काही पंचायतींनी त्याला पाठिंबा दिला आहे. याबाबत विचारले असता खंवटे यांनी, मी माझी भावना मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहे. गतकाळात आयोजकांबाबत तक्रारीही झाल्या होत्या. महत्वाचा मुद्दा हाच आहे, या आयोजकांच्या तालावर सरकार नाचणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com