पणजी: गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून गोव्याचा प्रचार करण्यासाठी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (IPB) सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. (Goa government uses social media for promotion of schemes)
एका अधिकाऱ्याने सांगितले की, "गोवा सरकारच्या विविध ऑनलाइन सेवांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि गोवा-IPB चे 'ऑनलाइन प्रमोशन' करण्यासाठी मंडळाने सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सीला काम देण्याचा निर्णय घेतला आहे."
गोवा आयपीबीने मार्केटिंग एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी आधीच निविदा काढली आहे. यामध्ये नमूद केले आहे की, एजन्सीला पाच वर्षांचा अनुभव असावा. मार्केटिंग एजन्सीला फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि ट्विटरवर गोवा IPB चा प्रचार करावा लागेल आणि गोवा-IPB वेबसाइटसाठी ब्लॉग पोस्ट तयार करावी लागेल.
केंद्राच्या व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीत राज्याची स्थिती खालावली आहे. राज्य सरकार आपली प्रतिमा सुधारण्यासाठी काम करत आहे, असे सूत्रांनी सांगितले. गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (GIDC) मधील अडथळ्यांमुळे स्थानिक उद्योजक आणि नवीन गुंतवणूकदार नवीन व्यवसाय वाढवू किंवा सुरू करू शकत नाहीत हे नवनियुक्त उद्योग मंत्री मौविन गोडिन्हो यांनी स्वतः मान्य केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.