पणजी : राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट (Covid 19) कमी होताना दिसत आहे. मात्र या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्य यंत्रणेवरचा ताण मात्र अधिक प्रमाणात वाढला आणि आरोग्य विषयक साधनांच्या अभावामुळे अक्षरश: आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. अशातच राज्याला ऑक्सिजनच्या तीव्र टंचाईचा (shortage of oxygen) सामनाही करावा लागला. मात्र गोवा राज्य तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी पूर्णपणे तयार असून, ऑक्सिजनचा साठा (Oxygen reserves) आणि पुरवठा याचा विचार करता राज्यात 40 केएल चा बफर ऑक्सिजन आहे. असे गोवा सरकारच्यावतीने हायकोर्टाला सांगण्यात आले आहे.
जर राज्यात तिसरी लाट आलीच तर त्या लाटेला थोपवण्यासाठी जे काही लागेल त्याची पूर्णपणे तयारी झाली असल्याचे राज्यसरकारने सांगितले असून राज्यात ऑक्सिजनचाही पुरेसा साठा असल्याचे सरकरने कोर्टात सांगितले आहे. सरकारतर्फे अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी हायकोर्टाला सांगितले की, दुसर्या लाटेच्या अनुभवाच्या आधारे आणि प्रत्येक रुग्णालयात बेडच्या संख्येच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले असून असे आढळले की तिसरऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ही तयारी पुरेशी आहे.
ऑक्सिजनचा साठा आणि पुरवठा याचा विचार करता राज्यात 40 केएल चा बफर ऑक्सिजन आहे. त्याशिवाय विविध एलएमओ ऑक्सिजनच्या टाक्या आणि पीएसए प्लांट्स बसविण्यात आले आहेत. जे पुरेसे असून, सध्यातरी याचा तुटवडा राज्याला आता भासणार नाही.
अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांच्या म्हणण्यानुसार, ऑक्सिजन साठी लागणारे बफर टॅंक बिनानी इंडस्ट्रीजमध्ये उपलब्ध असून त्यामध्ये 40 केएल इतका साठा राहू शकतो. ऑक्सिजनचे वाटप केंद्र सरकार करत असून उत्पादन काही खाजगी कंपनीद्वारे केले जात आहे.
सरकारला हायकोर्टाकडून जी विचारणा करण्यात अली होती त्याबद्दल बोलताना राज्य तिसऱ्या लाटेसाठी कश्याप्रकारे सज्ज आहे याची माहिती सरकारतर्फे अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी तज्ज्ञ समितीकडे दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.