Mopa Airport Project: गोवा सरकार कडून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्यास सुरवात

सरकारने हा प्रकार त्वरित थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल; मोपा पीडित शेतकरी संघटनेचा इशारा
Mopa International Airport
Mopa International AirportDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: गोवा सरकारने मोपा विमानतळासाठी भूसंपादनाच्या नावावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्यास सुरवात केली असून या प्रकाराचा गोवा कुळ-मुंडकार संघटनेचे समन्वयक दीपेश नाईक, बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे आणि मोपा पीडित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण गडेकर यांनी सरकारचा निषेध केला आहे. सरकारने हा प्रकार त्वरित थांबवावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. (Goa government starts grabbing farmers' lands for Mopa Airport Project)

Mopa International Airport
राज्यात भव्य फुड कोर्टची उभारणी

‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीशी संवाद साधताना दीपेश नाईक, संजय बर्डे, नारायण गडेकर म्हणाले, मोपा विमानतळासाठी (MOPA Airport) एक कोटी चौरस मीटर जमीन ताब्यात घेतलेली असतानाही या प्रकल्पाजवळ असलेली व भूसंपादन न झालेली जमीन सरकारी यंत्रणा व पोलीस बळ वापरून एमआर कंपनीच्या घशात घालण्याचे काम सरकारने चालवले आहेत. यापूर्वीही सरकारने येथील शेतकऱ्यांवर (Goa Farmer) मोठी दडपशाही केली आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

मोपा येथील शेतकरी सुरेश तळकटकर यांची जमीन सर्वे क्रमांक 94/6आणि नारायण साळगावकर यांची जमीन सर्व्हे क्रमांक 96/6याचे भूसंपादन न करताच या जमिनीत तारेचे कुंपण घालण्याचे काम जीएमआर कंपनीने सुरू केले आहे.

पोलिस (Goa Police) संरक्षणात तारेचे कुंपण

बळजबरीने तारेचे कुंपण घातल्याबद्दल त्याविरुद्ध तक्रार केली असता 70 पोलिस कर्मचाऱ्यांना आणून बेकायदेशीर कामाला संरक्षण दिले आहे. अशा प्रकारे दडपशाहीने शेतकऱ्यांची जमीन बळकावल्याबद्दल मोपा पीडित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण गडेकर, गोवा कुळ मुंडकार संघटना व बोडगेश्वर शेतकरी संघटनेतर्फे 7 जानेवारी रोजी उत्तर गोवा जिल्हाधिकारी रॉय यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com