Goa Government: यंदाचा अर्थसंकल्‍प सर्वसामान्यांसाठी!

तळागाळातील घटकांसाठी अर्थसंकल्प तयार व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वच खात्यांच्या बैठका घेतल्या आहेत.
Goa Government
Goa GovernmentDainik Gomantak

Goa Government: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 मार्चपासून सुरू होत असून त्याच दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अर्थमंत्री नात्याने 2023-24 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. हे अधिवेशन तीन दिवसांचे असेल, अशी माहिती विधानसभा प्रशासनाकडून देण्यात आली.

हे वर्ष निवडणुकांचे असल्याने करात फार वाढ होणार नाही असे अर्थतज्‍ज्ञांचे मत आहे. दरम्‍यान, अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी दिलासादायक असेल, असे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

‘आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्‍पनेवर यंदाचा अर्थसंकल्प असेल अशी चर्चा आहे. गेल्या अर्थसंकल्पातील बहुतांश योजना, प्रकल्प, पायाभूत सुविधांना वर्षभर चालना देण्यासाठी अर्थ खात्याच्या वतीने स्वतंत्र विभाग उभारण्यात आला आहे.

यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्‍या योजना व सुविधांची माहिती मिळविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेमार्फत माहिती घेण्यात येत आहे.

Goa Government
Fish Festival: फिश फेस्टिवलमुळे मोठी वाहतूक कोंडी

तळागाळातील घटकांसाठी अर्थसंकल्प तयार व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वच खात्यांच्या बैठका घेतल्या आहेत. आत्तापर्यंत विविध योजना, सुविधा आणि प्रकल्पांवर नेमका किती खर्च झाला, याची माहिती संचालकांकडून घेण्यात आली आहे.

शिवाय पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार करण्याची सूचनाही यावेळी देण्यात आल्या होत्या. त्‍यानुसार हा अर्थसंकल्‍प तयार करण्‍यात येत आहे.

Goa Government
Mapusa Municipality: म्हापसा नगरपालिकेत लवकरच होणार उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक

26 हजार कोटींचा अर्थसंकल्प?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थमंत्री या नात्याने 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला होता. तो 24 हजार 467 कोटींचा होता. यंदाचा अर्थसंकल्प साधारणपणे 26 ते 27 हजार कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे.

त्‍यात स्वयंपूर्ण गोव्यासाठीच्या विविध सामाजिक कल्याणकारी योजना, कृषी, उद्योग, कौशल्य विकास, ड्रोन उद्योगाला प्रोत्साहन दिल्याचे दिसून येईल अशी चर्चा आर्थिक क्षेत्रात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com