Viriato Fernandes: जमीन हडपण्याचं सरकारचं षडयंत्र, मायमोळे शेतीचा प्रश्‍न लोकसभेत मांडणार; विरियातो फर्नांडिस स्पष्टच बोलले

Goa Politics: पूर्वजांनी सांभाळून ठेवलेल्या जमिनी हडप करण्याचे राज्य सरकारचे षडयंत्र रचित आहे. वास्कोत पावसाळ्यात पूरग्रस्त स्थिती का निर्माण होते?
Viriato Fernandes: जमीन हडपण्याचं सरकारचं षडयंत्र, मायमोळे शेतीचा प्रश्‍न लोकसभेत मांडणार; विरियातो फर्नांडिस स्पष्टच बोलले
MP Viriato FernandesDainik Gomantak
Published on
Updated on

पूर्वजांनी सांभाळून ठेवलेल्या जमिनी हडप करण्याचे राज्य सरकारचे षडयंत्र रचित आहे. वास्कोत पावसाळ्यात पूरग्रस्त स्थिती का निर्माण होते? कारण मायमोळे शेतावर होत असलेले अतिक्रमण व सांडपाण्याचा प्रवाह. २०५० मध्ये मुरगाव तालुक्यात पुरग्रस्तस्थिती निर्माण होणार? अशी माहिती नासाने दिली आहे, अशी माहिती खासदार विरियातो फर्नांडिस दिली.

ओलसर जमीन घोषित करून सरकार मायमोळे शेत जमीन हडप करण्याचा प्रयत्न करीत आहे. आमदारांनी या शेत जमिनीवरील विविध विभागातून कागद पत्रांची मागणी केली आहे. यावरून समजते यात स्थानिक लोकप्रतिनिधींचा किती सहभागी आहे. पर्यावरणमंत्री मायमोळेतील शेत जमीन ओलसर करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती खासदार कॅ. फर्नांडिस यांनी दिली. मी मायमोळे शेत जमिनीचा मुद्दा लोकसभेत मांडणार आहे. दक्षिण गोव्यावर अन्याय होऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे, की शेतकऱ्यांना सर्व ती मदत करणार, तर येथे त्याच्या पक्षाचे नेते शेत जमिनीचे खाजगीकरण करण्यावर भर देत आहेत. केंद्र सरकारचे गोव्यातील जमिनीवर लक्ष आहे. कारण त्यांनी पूर्वीच जमिनी विकल्या आहेत. आता ते आमची शेती घेऊन पर्यावरण नष्ट करण्यासाठी पुढाकार घेत आहे. गरज भासल्यास मायमोळेतील शेत जमीन राखण्यासाठी तीव्र आंदोलन छेडणार आहे, असेही खासदार फर्नांडिस स्पष्ट केले.

Viriato Fernandes: जमीन हडपण्याचं सरकारचं षडयंत्र, मायमोळे शेतीचा प्रश्‍न लोकसभेत मांडणार; विरियातो फर्नांडिस स्पष्टच बोलले
Goa Politics News: गोव्यात 'नापास' मंत्र्यांना नारळ? जे. पी. नड्डा प्रगतीपुस्तक तपासणार, मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत

मायमोळे येथील शेत जमिनीला तळे, असे घोषित करून राज्य भाजप सरकार येथील पारंपरिक शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. पूर्वी मायमोळे येथे मोठ्या प्रमाणात शेती व्हायची. पुढे मांगोरहील - वरुणापूरी पठारावरील भागात आएनयस हंसा (नौदल ) आल्याने, त्यांनी मोठ मोठ्या इमारती उभारल्या.नंतर त्या इमारतीचे सांडपाणी नौदलाने सरळ मायमोळे शेतात सोडण्यास सुरुवात केली. यामुळे शेताचे रूपांतर तळ्यात झाले.तसेच एका शेत मालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात मायमोळे शेत जमीन कृषी क्षेत्र असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. पण राज्य सरकारचे नेते मायमोळे शेत तळे असे घोषित करण्यावर भर देत असल्याची माहिती स्थानिक शेतकरी मॅक्सी परेरा यांनी दिली. खरे तर आमच्या शेताची नासाडी केंद्र सरकारच्या आयएन हंसा (नौदल) व दक्षिण पश्चिम रेल्वे प्राधिकरणाने लावल्याची माहिती परेरा यांनी दिली.

लोकप्रतिनिधींनी मायमोळे शेत ‘ओलसर जमीन’ करून या शेताला तळ्याचे रूप देऊन येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बोटिंग सुरू करण्याचे योजिले आहे. आमच्या शेतात आलेले सांडपाणी काढण्यास मुरगाव पालिकेला व राज्य सरकारच्या संबंधित विभागांना होत नाही. मात्र आमच्या शेतात जमा झालेल्या सांडपाण्यावर पर्यटन स्थळ उभारण्याचा हेतू येथील लोकप्रतिनीधीने रचलेला आहे. आम्ही आमच्या शेत जमिनी कदापि ओलसर जमीन म्हणून घोषित करू देणार नसल्याचे मॅक्सी परेरा यांनी स्पष्ट केले.

Viriato Fernandes: जमीन हडपण्याचं सरकारचं षडयंत्र, मायमोळे शेतीचा प्रश्‍न लोकसभेत मांडणार; विरियातो फर्नांडिस स्पष्टच बोलले
Goa Politics: संडे डायलॉगसह विजय सरदेसाई 'फॉरवर्ड'; इंडिया आघाडीत कही खुशी, कही गम

माजी नगराध्यक्ष लिओ रॉड्रिगीस म्हणाले, मायमोळे शेत जमीन ओलसर जमीन घोषित करण्यामागील उद्देश सरकारने स्पष्ट करणे आवश्यक आहे. येथे आमच्या शेत जमिनी असून त्यावर पूर्वीच नौदल व इतर ठिकाणाचे सांडपाणी साचले आहे. आता राज्य ओलसर जमीन प्राधिकरण बोटिंग करण्याचे योजिले आहे. जर ओलसर जमीन घोषित झाल्यास, मायमोळे मांगोरहील परिसरातील घरांना धोका निर्माण होणार आहे.

माजी उपनगराध्यक्ष काशीनाथ यादव म्हणाले, पूर्वी मोठ्या प्रमाणात मायमोळेत भाजी लागवड केली जात होती.या शेतातून चार ठिकाणांहून पावसाचे पाणी यायचे. त्याच पाण्यातून येथील शेतकरी बंधू शेती व्यवसाय करीत असे. संबंधित विभागाने मायमोळे शेत जमीन ओलसर करण्यावर भर न देता.पूर्वी असलेली शेत जमीनी सारखी करून देण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी काशीनाथ यादव यांनी केली आहे.

Viriato Fernandes: जमीन हडपण्याचं सरकारचं षडयंत्र, मायमोळे शेतीचा प्रश्‍न लोकसभेत मांडणार; विरियातो फर्नांडिस स्पष्टच बोलले
Goa Politics: मुख्यमंत्री सावंतांच्या कारभारावर आमदार, मंत्र्यांची नाराजी; विश्वजीत राणेंकडून आमदारांचे वशीकरण सुरु

शेतकऱ्यांचे निवेदन

मायमोळेतील काही शेतकरी बंधूना राज्य ओलसर जमीन प्राधिकरणाॉतर्फसुनावणीसाठी पत्र पाठविण्यात आले नसल्याची माहिती खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी दिली आहे. फर्नांडिस यांनी मायमोळे शेताची पाहणी केली. तसेच रेल्वेने शेतात केलेल्या अतिक्रमणाची पाहणी केली. नौदल व रेल्वेने केलेल्या अतिक्रमणांची माहिती आपण केंद्रातील संबंधित विभागाकडे मांडणार असल्याचे कॅ. फर्नांडिस यांनी सांगितले. मायमोळे, मांगोरहील, बेलाबाय व बायणा भागातील शेतकरी बंधूनी मायमोळे शेती ओलसर जमीन करू नये, यासाठी निवेदन दक्षिण गोवा खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांना सादर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com