Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Five CCTV Cameras Per Panchayat: पंचायतींमधील सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी राज्य शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची विशेष योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Five CCTV Cameras Per Panchayat
Gram Panchayat CCTV PlanDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुरू असलेल्या एका सुनावणीदरम्यान, राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची एक नवी योजना आणली जात असल्याची महत्त्वाची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. शेर्लेट फर्नांडिस यांनी दाखल केलेल्या एका याचिकेदरम्यान ही माहिती न्यायालयात देण्यात आली.

पंचायतींमधील सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी राज्य शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची विशेष योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठीचा अंदाजे खर्च आणि त्याची तांत्रिक सुलभता तपासण्यासाठीची योग्य ती फाईल आधीच पुढे हलवण्यात आली आहे.

Five CCTV Cameras Per Panchayat
Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

सीसीटीव्ही बसवण्याची ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अंदाजे तीन आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता महाधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितली. पंचायतींमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रिकरण सुरक्षित किती काळ व कसे ठेवावे, याबाबतचे मसुदा धोरणदेखील आता तयार झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com