Goa IT: गोवा आयटीच्या पायाभूत सुविधा उभारण्याकरीता सरकार वचनबद्ध राहणार- रोहन खंवटे

Goa IT: गोव्यात लवकरच पहिले 3डी प्रिंटर तंत्रज्ञान सुरु करण्यात येणार आहे.
Goa IT | Rohan khaunte
Goa IT | Rohan khaunteDainik Gomantak
Published on
Updated on

Goa IT: आयटी क्षेत्रासाठी एक मॉडेल इकोसिस्टम तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकार वचनबद्ध आहे. जे आजच्या काळातील आयटी व्यवसायांच्या गरजा पूर्ण करील असे मत, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले आहे.

खंवटे म्हणाले, नव्या साधनसुविधांमुळे उत्तम रोजगाराच्या संधींसाठी परराज्यात गेलेल्या प्रतिभावंतांना गोव्यात परत आणण्यास मदत होईल. माहिती व तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन खात्यातर्फे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वितरित करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Goa IT | Rohan khaunte
Goa Latest News: ‘बार्देश बाजार’चे चेअरमन धर्मा चोडणकर पायउतार

एसटी, एससी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी लॅपटॉपसह सुसज्ज करण्यासाठी खात्याने ही योजना सुरू केली आहे. इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडच्या माध्यमातून खात्यातर्फे काल प्रत्येक तालुक्यातील 10 एसटी विद्यार्थ्यांना आणि 10 एससी विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.

3डी प्रिंटर तंत्रज्ञान लवकरच

कोविड काळात राज्याच्या दुर्गम भागात कनेक्टिव्हिटीची समस्या सरकारच्या लक्षात आली. पण हा मुद्दा सरकारने वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची संधी म्हणून घेतला आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात मदत केली. विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी पालकांनी केलेल्या त्यागाची आठवण ठेवणे गरजेचे आहे. गोवा लवकरच डिसेंबरमध्ये पहिले 3डी प्रिंटर तंत्रज्ञान सुरू करेल, अशी घोषणा खंवटे यांनी केली.

स्टार्ट अपसाठी आर्थिक पाठबळ देणार

सरकारने स्टार्ट अप पॉलिसी तसेच आयटी पॉलिसी लागू केली आहे आणि तरुणांना त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी आर्थिक पाठबळही दिले आहे, अशी माहिती रोहन खंवटे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com