Goa Assembly Session: मर्यादा 4 हजार कोटींची कर्ज 1500 कोटींचे! केंद्राकडून विशेष मदत; आर्थिक स्थितीबाबत मुख्यमंत्री समाधानी

Goa government financial condition: राज्याला २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारकडून ६९८ कोटी रुपयांचे विशेष साहाय्य प्राप्त झाले आहे.
Goa government financial condition
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa government financial condition Assembly Session

पणजी: गोवा सरकारची आर्थिक स्थिती सक्षम असून आवश्यकतेनुसारच कर्ज घेतले जात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात स्पष्ट केले. यावेळी पैसे कुठून येणार, हे कुणीच मला विचारले नाही. मात्र, मी १,०५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

राज्याला ४,००० कोटी रुपयांच्या कर्जाची मर्यादा होती, पण आम्ही गरजेपेक्षा जास्त कर्ज घेतले नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या आर्थिक व्यवस्थापनावर भर देत सांगितले की, राज्याला केंद्र सरकारकडून ३०० कोटी रुपये अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. तसेच विशेष साहाय्यता योजनेअंतर्गत १,१८५ कोटी रुपये मिळाले आहेत.

केंद्राकडून ६९८ कोटींची विशेष मदत

राज्याला २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारकडून ६९८ कोटी रुपयांचे विशेष साहाय्य प्राप्त झाले आहे. ही रक्कम ५० वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज स्वरूपात देण्यात आली आहे. याशिवाय, चालू आर्थिक वर्षात (२०२४-२५) केंद्राने गोव्याला एकूण १,१८५ कोटी रुपयांची मदत दिली आहे.

Goa government financial condition
Goa Assembly Session: आलेमाव यांचा अहवाल नामंजूर, सार्वजनिक उपक्रम समितीचा कार्यकाळ संपुष्टात; सिक्वेरांचे स्पष्टीकरण

गोवा अ‍ॅप्रोप्रिएशन बिल २०२५ मंजूर

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘गोवा अ‍ॅप्रोप्रिएशन बिल २०२५’ विधिमंडळात सादर केले. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीच्या अतिरिक्त अनुदानाच्या मागण्यांशी संबंधित विधेयकावर चर्चा झाली आणि ते मंजूर झाले.

Goa government financial condition
Goa Assembly Session: गोव्यात 24 नाही, 4 तासच पाणी! 'तिळारी'साठी 350 कोटी, टंचाईच्या समस्येवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

भविष्यात अधिक भांडवली गुंतवणूक

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, गोवा सरकार राज्याच्या आर्थिक वाढीला गती देत आहे. येत्या काळात पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com