हरमल येथील युवकाच्या खुनात परप्रांतीयांचाच सहभाग नाही तर राज्य सरकारही दोषी; अमित पाटकर

Goa Crime News: उत्तर गोव्यात जीटीटीएच्या नियमांचे उल्लघंन केले जात आहे. शॅक्सवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यांना केराची टोपली दाखवली जात आहे.
हरमल येथील युवकाच्या खुनात परप्रांतीयांचाच सहभाग नाही तर राज्य सरकारही दोषी; अमित पाटकर
Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हरमल येथील अमर दत्ताराम बांदेकर या युवकाने तेथील समुद्रकिनाऱ्यावर शॅक्सधारकांकडून चाललेल्या बेकायदेशीरपणावर आवाज उठवल्याने त्याचा खून केला जातो. ही गोष्ट निश्चितच धोकादायक आहे.

राज्यातील शॅक्स सर्रासपणे परप्रांतीयांना चालविण्यास दिले जात आहेत. पर्यटन खात्याचे शॅक्सधारकांवर व इतर यंत्रणांवर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे पर्यटन व्यवसाय आणखी अधोगतीला जाईल, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

काँग्रेस भवनात मंगळवारी (२८ जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत पाटकर बोलत होते. यावेळी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, नारायण रेडकर यांची उपस्थिती होती.

पाटकर म्हणाले, उत्तर गोव्यात जीटीटीएच्या नियमांचे उल्लघंन केले जात आहे. शॅक्सवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यांना केराची टोपली दाखवली जात आहे.

केरी, हरमल, मोरजी व मांद्रे या किनाऱ्यांवर पलंग टाकण्यासाठी जी परवानगी आहे, त्यापेक्षा पाचपटीने पलंग थाटण्यात आले आहेत. हरमल येथील शॅक्सधारकाने मर्यादेपेक्षा बेड घातल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्याचा अडथळा होत होता म्हणून आवाज उठवला, त्यामुळेच त्याचा खून करण्यात आला.

हरमल येथील युवकाच्या खुनात परप्रांतीयांचाच सहभाग नाही तर राज्य सरकारही दोषी; अमित पाटकर
Sara Ali Khan Video Video: भाजप नेत्याच्या मुलासोबत 'सारा' करतेय Dating? गोव्यातला व्हिडिओ व्हायरल

शिवाय या ठिकाणी ट्रेड विभागाचे अधिकारी आता महसूल खात्याचे महसूल गोळा करण्याचे काम करतात, असे दिसून येत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला. शॅक्सधारकांची ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठीची जीपे-फोन-पेची खाती पाहिली तर ती गोव्यातील कोणाचेही नसतील.

पर्यटन खात्याने डिसेंबर २०२४ मध्ये तीन कोटी रुपये खर्च करून 'रापणकारांचो सी फूड फेस्टिव्हल' हरमल किनाऱ्यावर आयोजित केला. त्याद्वारे राज्य सरकारला भ्रष्टाचार करायच होता, असा आरोप करून हरमल येथे युवकाच्या झालेल्या खुनात केवळ परप्रांतीयांचाच सहभाग नाही तर राज्य सरकारही त्यात दोषी आहे.

- अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com